मुंबई : Nykaa ब्युटी ई-कॉमर्स कंपनीच्या सीईओ आणि संस्थापक फाल्गुनी नायर अलीकडेच सर्वात श्रीमंत महिला अब्जाधीश बनल्या आहेत. बाजारात लिस्ट झाल्यानंतर कंपनीला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर हे घडले आहे. नायर यांनी ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकात आणखी सहा भारतीय महिला अब्जाधीशांचा समावेश केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वयाच्या ५८ व्या वर्षी नायर यांच्याकडे नायकाचे (Nykaa) अर्धे शेअर्स आहेत. नायर यांनी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर कंपनी सूचीबद्ध म्हणजे लिस्टिंग करण्यापूर्वी सांगितले होते की, त्यांनी वयाच्या 50 व्या वर्षी कोणत्याही अनुभवाशिवाय नायका (Nykaa) सुरू केली. 


फाल्गुनी नायर म्हणाल्या की, नायकाचा (Nykaa)प्रवास तुम्हाला प्रत्येकाला तुमच्या आयुष्याची नायिका होण्यासाठी प्रेरित करायचा आहे. फाल्गुनी नायर यांच्या जीवनातून गुंतवणूकदारांना अनेक गोष्टी शिकता येतील. यशस्वी व्यवसाय सुरू करायला वयाचं बंधन नसतं हे नायर यांनी दाखवून दिलं आहे. 


स्वतःकडे ठेवा असा एक प्लान 


गुंतवणूकदाराने नेहमी आधी एक योजना तयार ठेवावी. फाल्गुनी नायरने स्वत:ला एक डेडलाइन दिली होती. 50 वर्षांच्या होईपर्यंत त्या स्वतःहून कोणतातरी व्यवसाय सुरू करणार. यातूनच नायकाचा (Nykaa) जन्म झाला.


फाल्गुनी नायक यांनी जीवनात काही निर्णय जाणीवपूर्वक घेतले, जसे की बिझनेस स्कूलमध्ये जाणे. एका कंपनीत 19 वर्षे काम करणे. जेथून उत्तम अनुभव घेऊन त्या बाहेर पडल्या. आणि नंतर असे क्षेत्र निवडणे ज्याबद्दल भारतात फारसे ऐकले गेले नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी त्यांचे संशोधन करावे. (Leaders : वयाच्या 50 व्या वर्षी व्यवसाय थाटणारी 'ती' आज देशातील सर्वात श्रीमंत महिला) 


 


सल्ला सगळ्यांचा घेतला मात्र एकल फक्त मनाचं 


फाल्गुनी नायर यांनी कंपनी लॉन्च केल्यानंतर एका मुलाखतीत सांगितले की, आशा आहे की, अनेक महिला आपल्या स्वप्नांसाठी जगतील. Nykaa 2012 मध्ये आला, जेव्हा प्रत्येकजण मेकअप खरेदी करण्यासाठी जवळपासच्या दुकानात जात असे. त्यांनी हा ट्रेंड मोडण्याचे धाडस केले आणि अनेक वर्षानंतर, Nykaa आपल्या प्लॅटफॉर्मवर 300 हून अधिक ब्रँड्सची तीन लाख उत्पादने विकते.


जोखीम जास्त, अधिक परतावा 


फाल्गुनी नायर यांनी १९ वर्षे कोटक कंपनी (Kotak Compnay)मध्ये काम केल्यानंतर सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला. वयाची पन्नासी गाठण्याच्या काही महिन्यांपूर्वी त्यांनी स्वतःच स्टार्टअप सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. 10 वर्षांपूर्वी, ऑनलाइन सौंदर्य प्लॅटफॉर्म ही एक नवीन गोष्ट होती.


वाढ आणि नफा निवडा


काही दिवसांपूर्वी, नायर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, तिचा सौंदर्य आणि फॅशन कॉमर्सचा उद्योग नवीन टप्प्यात आहे. त्यामुळे वाढीस मोठा वाव आहे. आणि गुंतवणूकदारांना असेही वाटते की विक्री वाढल्याने नफा अनेक पटींनी वाढेल.