नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलमध्ये एका महिलेने तक्रार दिली की, काही दिवसांपासून तिच्या ऑनलाईन पेजवर एक व्यक्ती अश्लील मॅसेज करीत आहे. एवढेच नाही तर हा व्यक्ती व्हाट्सअपवरही कॉल आणि अश्लील मॅसेज सेंड करीत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली पोलीसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. ज्याने 200 महिलांना ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अश्लील मॅसेज पाठवले आहेत. याशिवाय तो महिलांना अश्लील फोटो आणि व्हिडीओदेखील पाठवत असे. या ऑनलाईन स्टॉकरचं नाव मनोज कुमार आहे. हा एका फॅक्टरीत काम करणारा कामगार आहे. पोलिसांनी त्याच्याकडून  मोबाईल फोन आणि 2 सिम कार्ड जप्त केले आहे.


दिल्ली पोलिसांना एका महिलेने तक्रार केली होती की, काही दिवसांपूर्वी ऑनलाईन पेजवर तिला एका व्यक्तीकडून अश्लील मॅसेज येत आहेत. एवढेच नाही तर तो व्यक्ती आता व्हाट्सअपवर देखील अश्लील फोटो आणि व्हिडीओ पाठवत होता. महिलेच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवून घेतली. 


तपासानंतर पोलिसांनी मनोजला अटक केली. त्याच्याकडून एक फोन आणि 2 सिम जप्त केले. या फोनच्या माध्यमातून त्याने तब्बल 200 महिलांना अश्लील मॅसेज पाठवल्याचे समोर आले. 


आरोपी मनोरुग्ण


तपासादरम्यान पोलिसांच्या लक्षात आले की, त्याचे अनेक महिन्यांपासून पत्नीशी भांडण सुरू होते. ज्यानंतर सोशल मीडियावर तो महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असे. त्यानंतर मॅसेजरने अश्लील मॅसेज, फोटो, व्हिडीओ पाठवत असे.त्याने आतापर्यंत 200  महिलांशी ऑनलाईन स्टॉकिंग केली आहे.