चेंजिंग रूममध्ये तरूणी कपडे बदलत होती, दुकानदाराने बनवला अश्लिल Video, त्यानंतर जे काही झालं...
Obscene video Of Girl: अश्लिल फोटो व व्हिडिओ बनवून अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला. तिला वारंवार धमक्या येऊ लागल्या. महिनाभर हे प्रकरण चाललं. त्यानंतर तरुणीने कंटाळून ही गोष्ट घरच्यांना सांगितली अन्...
Crime News: साधारण सहा महिन्यापूर्वी एक तरुणी कपडे घेण्याचा निमित्ताने एका दुकानात (Cloth Shop) गेली होती. कपडे पाहिले, त्यातला एक ड्रेस आवडता. व्यवस्थीत बसतोय का पाहण्यासाठी चेंजिंग रूम (Changing Room) गाठलं. कपडे घालून पाहिले आणि खरेदी करून घरी घेऊन गेली. काही दिवसानंतर तिच्या मोबाईल नंबरवर एक व्हिडिओ आला. हा व्हिडिओ पाहून तरुणीला धक्काच बसला. ती कपडे बदलत असतानाचा अश्लिल व्हिडिओ (Obscene video Of Girl) तिला पाठवण्यात आला होता.
अश्लिल फोटो व व्हिडिओ बनवून अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल (Blackmail) करण्याचा प्रयत्न झाला. तिला वारंवार धमक्या येऊ लागल्या. महिनाभर हे प्रकरण चाललं. त्यानंतर तरुणीने कंटाळून ही गोष्ट घरच्यांना सांगितली. 6 महिन्यांपूर्वी जयपूर शहरातील शुभम रेडीमेड स्टोअरच्या चेंजिंग रूममधून अश्लिल फोटो व व्हिडिओ काढण्यात आल्याचं पाहून पालकांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये (Jaipur Police) धाव घेतली. (Obscene video made by shopkeeper when Young girl changing clothes Crime News)
पाच महिन्यांपूर्वी पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल झाली होती. या प्रकरणाचा तपास शाहपुरा डीएसपीकडे देण्यात आला होता मात्र डीएसपींनी कोणतीही कारवाई केली नाही. या प्रकरणी दोन तरुणांना अटक करून कारागृहात पाठवण्यात आले, मात्र दुकानमालकावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. प्रकरण इथंच थांबलं नाही, नातेवाईकांनी दुकानाबाहेर आंदोलन (Strike For Justice) सुरू केलं.
आणखी वाचा - Bold Web Series: जरा हळूच... 'या' वेब सिरीज पाहून अंगाची होईल लाहीलाही!
दरम्यान, कुटुंबीयांमध्ये संतापाचं वातावरण होतं. संतप्त नातेवाईक रेडिमेड दुकानाबाहेर पोहोचले आणि धरणं आंदोलन सुरू केलं. दुकान मालकाला अटक करा, अशी त्यांची मागणी होती. यावेळी घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये वादावादी देखील झाली. आंदोलन करणाऱ्या लोकांनी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोपही केला आणि पोलिस अधिकाऱ्यांशी बाचाबाची झाली. यावर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय. सध्या पोलीस या प्रकरणाच्या अधिकचा तपास करत आहेत.