मुंबई : ओखी चक्रीवादळाचा प्रवास आता गुजरातच्या दिशेनं सुरू आहे. ताशी 18 किलोमीटर वेगानं हे वादळ सुरतच्या दिशेनं पुढे जात असल्याची माहिती हवामान खात्यानं आज दिली आहे.


काही तासांमध्ये वादळ सुरतच्या दिशेनं सरकरणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वादळ मुंबईच्या किनाऱ्यापासून सुमारे साडे तीनशे किलोमीटर अंतरावर तर गुजरातच्या किनाऱ्यापासून साडेपाचशे किलोमीटर अंतरावर आहे. येत्या काही तासांमध्ये वादळ सुरतच्या दिशेनं सरकरणार असताना त्याचा जोर कमी होत जाईल असा अंदाज आहे. आज मध्यरात्रीनंतर ओखी वादळ गुजरात आणि महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टी धडकेल असा अंदाज आहे. वादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून मुंबई आणि कोकण कोकणपट्टीवर दिवसभर हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याच्या अंदाज वर्तवण्यात आला आहे.


निवडणूक प्रचारावरही परिणाम


दरम्यान, ओखी चक्रीवादळाचा फटका गुजरातमधील विधानसभा निवडणूक प्रचारालाही बसला आहे. गुजरातमधील किनाऱ्यालग असलेल्या जिल्ह्यांमधील काही आयोजित प्रचारसभा राजकीय पक्षांनी रद्द केल्या आहे. पंतप्रधान मोदींसह भाजपच्या अनेक स्टार प्रचारकांच्या सभाही रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केल्यावर पहिल्यांदाच गुजरात दौऱ्यावर असलेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा आज गुजरातमध्ये होत आहे. मात्र, गुजरातमध्ये सध्या चक्रीवादळ आणि प्रचंड वेगाने वारे वाहात असल्यामुळे राहुल गांधी यांच्या सभेवरही अनिश्चिततेचे सावट आहे.