भुवनेश्वर : राज्य सरकारने नवविवाहित जोडप्यांसाठी एक मोठा निर्णय़ घेतला आहे. राज्यातील नवविवाहीत जोडप्यांना आता मोफत कंडोम आणि वेडिंग किट वाटण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाने नवविवाहीत कपल्सही अचंबित झाले आहेत. दरम्यान नवविवाहित जोडप्यांना का मोफत वाटले जातायत कंडोम? राज्य सरकारने अशा प्रकारचा निर्णय घेण्यामागचं कारण काय? जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील ओडिशा सरकारने नवविवाहित जोडप्यांना मोफत कंडोम आणि वेडींग किट वाटण्याचा मोठा निर्णय घेतलाय. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM)  अंतर्गत राज्य सरकार नवविवाहित जोडप्यांना या आरोग्यविषयक वस्तू पुरवण्यात येणार आहे. 


राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत 'नई पहल योजने'चा उद्देश नवविवाहित जोडप्यांनी तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी कुटुंब नियोजनाच्या पद्धतींचा अवलंब करण्याच्या गरजेबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे.


किटमध्ये काय आहे? 
राज्य सरकार नवविवाहित जोडप्याला कुटुंब नियोजन, विवाह नोंदणी फॉर्म, कंडोम, आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या आणि फायद्यांची पुस्तिका असलेली 'शादी किट' भेट देण्याची योजना आखत आहे. याशिवाय या किटमध्ये गर्भधारणा चाचणी किट, टॉवेल, कंगवा, बिंदी, नेल कटर आणि आरसा यांसारख्या इतर साहित्याचाही समावेश असणार आहे. 


अधिकाऱ्यांचे म्हणणे काय?
कुटुंब नियोजन संचालक डॉ. विजय पाणिग्रही या योजनेवर म्हणालेत, आशा सेविकांना सप्टेंबर महिन्यापासून नवविवाहित जोडप्यांना किट वाटपाचे काम सोपवले जाईल. तसेच या नवीन जोडप्यांना मुल दत्तक घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. आशा सेविकांना या संदर्भातले प्रशिक्षणही दिले जाणार असल्याचे त्यांनी म्हटलेय.  


निर्णयामागचं 'हे' आहे कारण
ओडिशा सरकारने राज्यातील नवविवाहीतांना कंडोम आणि वेडींग किट वाटण्याचा निर्णय घेतलाय. राज्यातील लोकसंख्या नियंत्रणात यावी यासाठी हा निर्णय़ घेण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यातील लोकसंख्या नियंत्रणात येते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.