Shocking News: देशात टोमॅटोच्या (tomato price) वाढलेल्या भावामुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. अनेक ठिकाणी टोमॅटोने शंभरी पार केली आहे. घाऊक बाजारातही भाव 60 ते 80 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. टोमॅटोचे भाव गगनाना भिडल्याने अनेकजण वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधत आहेत. अशातच ओडिशामध्ये (Odisha) टोमॅटोसाठी एका व्यक्तीने दोन मुलांनाच गहाण ठेवल्याचे समोर आले आहे. मात्र सगळा प्रकार समोर आल्यानंतर टोमॅटो विक्रेत्याला चांगलाच धक्का बसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओडिशाच्या कटकमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. ओडिशामध्ये एका व्यक्तीने टोमॅटोसाठी भाजीच्या दुकानात दोन मुलांना उभे केले आणि निघून गेला. काही वेळाने दुकानदार मुलांशी बोलला असता त्याची फसवणूक झाल्याचे त्याल समजले. मुलांना गहाण ठेवून दोन किलो टोमॅटो घेऊन ती व्यक्ती फरार झाली होती.


नेहमीप्रमाणे नंदू नावाची व्यक्ती कटकच्या चतराबाजार भाजी मंडईत भाजीचे दुकान थाटून बसला होता. त्यावेळी एक व्यक्ती  दोन अल्पवयीन मुलांसह ग्राहक असल्याचे भासवत नंदूच्या दुकानात आला. त्याने नंदूकडून दोन किलो टोमॅटो घेतले. 130 रुपये प्रतिकिलो दराने त्या व्यक्तीने टोमॅटो खरेदी केले. दोन किलो टोमॅटो घेतल्यावर त्या व्यक्तीने नंदूला सांगितले की मला अजून 10 किलो घ्यायचे आहेत. मी माझे पाकिट गाडीतच विसरलो आहे. माझी मुलं टोमॅटो घेतील तोपर्यंत मी कारमधून पाकिट घेऊन येतो. असे बोलून ती व्यक्ती तिथून निघून गेली. त्यानंतर इकडे मुलं आणि दुकानदार नंदू दोघेही त्याची व्यक्तीची वाट बघत बसले.


दुकानदाराला आला संशय


बराच वेळ झाल्यानंतरही ती व्यक्ती परत न आल्याने नंदूला त्याच्यावर संशय आला. त्यानंतर नंदून दोन्ही मुलांची विचारपूस केली. त्यांची चौकशी केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे नंदूच्या लक्षात आहे. नंदूने लगेचच दोन्ही मुलांना त्याच्या दुकानात बसवून ठेवलं. तोपर्यंत आजूबाजूचे दुकानदारही नंदुच्या दुकानासमोर पोहोचले. लोकांची गर्दी पाहताच दोन्ही अल्पवयीन मुले रडू लागली.


मुलांनी सांगितली हकीकत


रडत रडत मुलांनी हकीकत सांगायला सुरुवात केली. बरंग पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नंदनकानन येथील रहिवासी असल्याचे दोघांनी सांगितले. मुलांनी सांगितले की, 'आम्हाला इथे आणणाऱ्या व्यक्तीला आम्ही ओळखत नाही. त्या व्यक्तीने आम्ही दोघांना काम करून देण्याच्या बहाण्याने येथे आणले होते आणि 300 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.' त्यानंतर काही तासांनंतर नंदूने आपलं नुकसान झालं आहे हे मान्य करून दोन्ही अल्पवयीन मुलांना सोडून दिले.