Odisha Train Accident: ओडिशातल्या बालासोर (Balasore) इथं झालेल्या भीषण रेल्वे अपघातात (Railway Accident) 261 जणांचा मृत्यू झाला तर 900 प्रवासी जखमी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अपघातग्रस्त भागाचा दौरा केला. त्यानंतर त्यांनी कटक इथल्या रुग्णालयात जाऊन जखमी प्रवाशांची भेट घेत त्यांची विचारपूस केली. यावेळी पीएम मोदी यांच्याबरोबर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaisnaw) आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते. जखमी प्रवाशांची भेट घेतल्यानंतर मीडियाशी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी या अपघाताला दोषी असणाऱ्यांना सोडलं जाणार नाही, कठोर शिक्षा केली जाईल असं सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे अपघात खूप भीषण होता. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांच्या उपचारात कोणतीही कमतरता येऊ देणार नाही, असं पीएम मोदी यांनी सांगितलं. ही एक गंभीर घटना आहे, अपघाताची प्रत्येक बाजूने चौकशीचे करण्याचे निर्देश देण्यात आले असून दोषी असणाऱ्यांवार कठोर कारवाई केली जाईल असंही पीएम मोदी यांनी सांगितलं. 


पीएम मोदी बालासोर जिल्ह्यातील बहनागा बाजार स्टेशन जवळ वायू सेनेच्या हेलिकॉप्टरमधून उतरले. तिथून त्यांनी थेट अपघातग्रस्त ठिकाणी पोहोचत पाहणी केली. त्यानंतर तिथल्या रेल्वे अधिकारी आणि आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांच्या उपचारात कोणतीही कमतरता पडू देणार नाही असे निर्देश तपीएम मोदींनी संबंधीत यंत्रणांना दिली.


मृतांचा आकडा वाढला
ओडिशा रेल्वे अपघातात मृतांचा आकडा 288 वर पोहोचला आहे. शुक्रवारी संध्याकाळी हा भीषण अपघात झाला. मालगाडीचा एक डब्बा पटरीवरुन उतरल्यानंतर मागून आलेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसने मालगाडीला धडक दिली. त्यानंतर आणखी बंगलुरु-हावडा एक्स्प्रेसने कोरोमंडला एक्स्प्रेला धडक दिली. या अपघातात रेल्वेचे डबे अक्षरश: विखुरले होते. मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.  ओडिशाच्या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल अशी घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. 


अनेक गाड्या रद्द
ओडिशा येथे झालेल्या रेल्वे अपघाताचा थेट परिणाम वंदे भारत एक्स्प्रेसवरही झाला असून, 3 जून 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या वंदे भारत ट्रेनचा लोकार्पण सोहळाही रद्द करण्यात आला आहे. ओडिशा रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. मडगाव ते सीएसएमटी या मार्गावर ही रेल्वे धावणं अपेक्षित होतं.