Python Viral Video : साधा साप पाहिला तरी प्रत्येकाला घाम फुटतो पण जर अजगर तुमच्या अंगावर चावा घेण्यासाठी धावून आला तर, हा विचार करूनच घाबरल्यासारखं होतं. अजगर संपूर्ण माणसालाही पूर्णपणे गिळू शकतात. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे त्यामध्ये एकजण घरात सीलिंगमध्ये लपून बसलेल्या महाकाय अजगराला बाहेर काढताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे? 
या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सीलिंगमधील सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. सीलिंग उलगडतो तेव्हा एका महाकाय अजगर बाहेर येतो. अजगराखाली पडल्यानंतर पळण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी ती व्यक्ती अजगराला पकडण्याचा प्रयत्न करते तेव्हा अजगर हल्ला करतो. 


 



दोन वेळा अजगर व्यक्तीवर हल्ला करतो त्यानंतर अजगराच्या तोंडावर पाय देऊन त्याला पकडण्यात यशस्वी ठरतो. त्यावेळीसुद्धा एका क्षणासाठी असं वाटतं की अजगराने त्याचा पाय पकडला की काय?, मात्र सुरक्षितपणे तो अजगराला पकडल्याचं दिसत आहे.


हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला दिसत आहे. आत्तापर्यंत लाखो लोकांनी व्हिडीओ पाहिला असून हजारो लोकांनी व्हिडिओला लाईक केलं आहे.