Reward Posters : अनेक जण घरात आवडीने एखादा प्राणी किंवा पक्षी पाळतात. कुत्रा-मांजर असे प्राणी (Pets) किंवा पोपटसारखे (Parrot) पक्षी त्यांच्या कुटुंबातील एक सदस्यच असतात. या पाळिव प्राण्यांची नावंही ठेवली जातात. कुत्रा-मांजर असं म्हटलेलंही त्यांना आवडत नाही. काही जणं तर इतके हौशी असतात की आपल्या आवडत्या प्राण्यासाठी काहीही करायला तयार असतात. तो घरात नसेल तर करमत नाही. अशीच एक घटना समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका कुटुंबाने घरात पोपट पाळला होता. कुटुंबातील सदस्यांचा त्याच्यावर  इतका जीव होता की त्याच्याशिवाय त्यांना करमत नव्हतं. पण काही दिवसांपूर्वी हा पोपट घरातून उडून गेला आणि कुटुंबाव दु:खाचा डोंगरच कोसळला. या कुटुंबाला इतकं दु:ख झालं की त्यांनी अन्नत्याग केला. इतकंच नाही तर पोपटाच्या विरहात त्यांनी शहरभर पोस्टर्स लावले. शिवाय पोपट शोधून आणणाऱ्यास इनामही घोषित केलं. विशेष म्हणजे या कुटुंबातील एक मुलगी शिक्षणानिमित्ताने परराज्यात शिकत होती. पोपट घरातून उडून गेल्याचं समजल्यावर तिने शिक्षण मध्येच सोडत घर गाठलं. (Pet Parrot Lost Family is Grieving)


शहरभर पोस्टर्स लावले
हे प्रकरण मध्यप्रदेशमधल्या (Madhya Pradesh) दमोह इथलं आहे. इथल्या शक्तीनगर कॉलनीत राहणाऱ्या पुष्पा खरे यांच्या कुटुंबातील सर्वांच लाडका पोपट एकेदिवशी अचानक उडून गेला. 23 मार्चला तो घरातून गायब झाला. पोपटाच्या गायब होण्याने कुटुंब अस्वस्थ झालं, त्यांनी सर्वत्र शोध घेतला पण पोपट कुठेच सापडला नाही. अखेर खरे कुटुंबाने शहरभर पोस्टर्स लावले. पोपट शोधून आणणाऱ्याला दोन हजार रुपयांचं बक्षिसही जाहीर करण्यात आलं. 


घराचा दरवाजा चुकून उघडा राहिला
23 मार्चला पिंजऱ्याची साफसफाई करताना पोपटाला पिंजऱ्यातून बाहेर काढलं. पण चुकून घराचा दरवाजा उघडा होता. पोपट उघड्या दरवाजातून फुर्रर झाला. पोपटचा नाव बिट्टू असं ठेवण्यात आलं होतं. विशेष म्हणजे तो प्रशिक्षित होता. 


मुलग वैद्यकिय शिक्षण सोडून आली
पोपट उडून गेल्याने कुटुंबाला धक्का बसला असून त्यांनी अन्नत्याग केला आहे. पुष्पा खरे या या खासगी रुग्णालयता काम करतात, पण 23 मार्चपासून त्या कामावरही गेल्या नाहीत. इतकंच नाही, तर त्यांची मुलगी उदयपूरमध्ये वैद्यकिय शिक्षण घेत होती. शिक्षण सोडून ती आपल्या घरी परतली असून तीही पोपट शोधण्याच्या कामात व्यस्त झाली आहे.