नवी दिल्ली : केंद्रीय पर्यटन राज्य मंत्री, खासदार महेश शर्मा काही ना काही वादग्रस्त विधानाने चर्चेत असतात. महेश शर्मा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत महेश शर्मा यांनी जनतेला अन्न, वस्त्र, नोकरी देण्याची जबाबदारी देवाची आहे. जिथे देवच या गरजा पूर्ण करू शकत नाही तिथे खासदार काय करणार? असा सवाल केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी भजन लाल मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात जनतेशी संवाद साधताना 'देवही माणसाच्या गरजा शंभर टक्के पूर्ण करू शकत नाही आणि आपण तर मानव आहोत. आपल्या सगळ्यांपेक्षा देवच जास्त वेडा आहे. देवानेच आपली निर्मिती केली आहे तर अन्न, वस्त्र, नोकरी, शिक्षण देणे ही देवाचीच जबाबदारी असल्याचे' विधान महेश शर्मा यांनी केले. 


गोतमबुद्धनगर मतदारसंघातून महेश शर्मा खासदार आहेत. याआधीही महेश शर्मा यांनी वादग्रस्त विधान केले होते. राहुल गांधी यांचा पप्पू तर प्रियंका गांधी यांचा पप्पी असा उल्लेख केला होता. 


राहुल गांधींच्या चौकीदार चोर है या मोहिमेला उत्तर देण्यासाठी आता भाजपाच्या जवळपास सर्व नेत्यांनी आपल्या ट्विटरचे नावच बदलून टाकले आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून निवडणुकीच्या प्रचारासाठी 'मैं भी चौकीदार' हे अभियान सुरू करण्यात आले आहे. महेश शर्मा यांनीदेखील आपले ट्विटरचे नाव बदलून त्यापुढे 'चौकीदार' नाव जोडण्यात आले आहे.