मुंबई : ओला उबर चालकांनी बेमुदत संपाची घोषणा केली आहे. ओला उबर चालकांची कुर्ला इथे ओला उबर ऑफिस बाहेर निदर्शनं केली. वाढत्या इंधन दरा सोबत प्रति किलोमीटर दर वाढवण्याऐवजी ते कमी केले आहेत. त्यामुळे दर वाढवून मिळावे यासाठी निदर्शने करण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओला उबर व्यवस्थापनाने चालकांसोबत सुरुवातीला जे करार केले होते त्याच पालन केलं नाही. ओला उबर व्यवस्थापनाने मागण्या मान्य केल्या नाहीत. तर बेमुदत संप करण्याचा ओला उबर चालकांचा इशारा दिला. 


महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या नेतृत्वाखाली वाहन चालकांनी निदर्शनं केली.