धक्कादायक! ओला ड्राईव्हरने महिले समोर सुरु केला पॉर्न व्हिडिओ आणि...
धक्कादायक प्रकार आला समोर
मुंबई : राजधानी दिल्लीत महिलांसोबत छेडछाडीच्या आणि चुकीच्या वागणुकीच्य़ा अनेक बातम्या येत असतात. पण बंगळुरुमधून आता नवीन प्रकरण समोर आलं आहे. एका 22 वर्षीय महिलेने ओला कॅब ड्राईव्हरविरोधात चुकीच्या पद्धतीने वागणुक दिल्याचा आरोप केला आहे. महिलेने म्हटलं की, जेव्हा ती कॅबमध्ये बसली त्यानंतर तो तिच्याकडे एकटक बघत होता. त्यानंतर त्याने मोबाईलमध्ये पॉर्न व्हि़डिओ लावला आणि हस्तमैथुन करु लागला.
महिला न्यू टाउन येथून जेपी नगरला जात होती. महिलेने लगेचच कॅब ड्राईव्हरच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी शनिवारी लैंगिक छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. महिला ही एका खासगी कंपनीत काम करते.
ड्राईव्हरने गाडी नाही रोखली
महिलेने तक्रारीत म्हटलं आहे की, सकाळी 6:28 मिनिटांनी जेपी नगर जाण्यासाठी ओला कॅब बुक केली होती. गाडीमध्ये बसल्यानंतर काही वेळात महिलेने पाहिलं की तो तिला एकटक पाहतो आहे. यानंतर त्याने फोनमध्ये पॉर्न व्हिडिओ सुरु केला. यानंतर तो गाडीतच हस्तमैथुन करु लागला. त्यानंतर महिलेने कॅब थांबवण्यासाठी सांगितलं पण त्याने ऐकलं नाही. त्यानंतर महिलेला त्याने जे.पी नगरला सोडलं.
ओलाकडून ड्राईव्हरची हकालपट्टी
महिलेच्या तक्रारीनंतर कॅब कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटलं की, 'ड्राईव्हरला आम्ही कामावरुन काढून टाकलं आहे. पोलिसांना आम्ही सगळी मदत करु. कंपनी महिलेच्या बाजुने उभी आहे.