Ola, Uber आणि Rapido च्या ऑटो सेवा बंद, जाणून घ्या का घेतला एवढा मोठा निर्णय
ओला आणि उबर या कंपनी आपल्या ग्राहकांकडून एक्स्ट्रा चार्ज वसलू करत असल्याने...
Ola, Uber, Rapido News: Ola, Uber आणि Rapido च्या ऑटो वापर करण्यासाठी आताची सर्वात मोठी बातमी...Ola, Uber आणि Rapido ची सर्विस ही अवैध (illegal) असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे परिवहन विभागाने या तिन्ही ऑटो सर्विसेला तीन दिवसात सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. (Ola, Uber, Rapido autos to stop service nmp)
कोणी आणि कुठे घेण्यात आला निर्णय?
ओला आणि उबर या कंपनी आपल्या ग्राहकांकडून एक्स्ट्रा चार्ज वसलू करत असल्याने कर्नाटक परिवहन विभागाने (Karnataka Transport Department) हा निर्णय घेतला आहे. ओला आणि उबरद्वारा दोन किमीसाठी किमान भाडं 100 रुपये चार्ज करण्यात येतं. यासंदर्भात परिवहन विभागाकडे ग्राहकांच्या वारंवार तक्रारी येतं होत्या. त्यामुळे विभागाने कंपनीला नोटीस पाठवल्या. बेंगळुरुमध्ये (Bangalore) 2 किमीसाठी किमान भाडं 30 रुपये आणि त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी 15 रुपये आहेत. पण ओला आणि उबर या कंपन्यापेक्षा जास्त पैसे आकारण्यात येतात.
बेंगळुरूचे खासदार तेजस्वी सूर्या (MP Tejashwi Surya) यांनी कारवाईची मागणी केली होती. मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांनी त्यांच्या मागणीवर ही कारवाई केली.दरम्यान इतर मुख्य शहरांमध्ये मुंबई, दिल्ली सारख्या शहरात गेल्या काही वर्षांमध्ये ओला आणि उबर यांची मनमानी वाढली आहे. कनार्टक सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर इतर शहरांमध्येही यांचा मनमानीला चाप लावण्यासाठी असा निर्णय घेण्यात येईल का हे बघावं लागेल.