नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी नोटबंदीची घोषणा केली होती. नोटबंदीला आता 1 वर्ष पूर्ण होत आहे पण एका वर्षानंतरही रिझर्व्ह बँकेला परत आलेल्या जुन्या नोटा अजून मोजत्या आलेल्या नाही. भारतीय रिझर्व बँकेने माहितीच्या अधिकाराअंतर्गत ही माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिझर्व्ह बँकेने म्हटलं की, 30 सप्टेंबरपर्यंत  500 रुपयांच्या 1,134 दशलक्ष नोटा आणि 1000 रुपयांच्या 524.90 दशलक्ष नोटा मोजल्या गेल्या आहेत. म्हणजे 71 टक्के नोटा मोजल्या गेल्या आहेत. आरटीआयनुसार 500 रुपयांच्या नोटांची किंमत 5.67 लाख आहे तर 1000 रुपयांच्या नोटांची किंमत लाख कोटी रुपये आहे. म्हणजे 30 सप्टेंबर पर्यंत 10.91 लाख कोटी रुपयांच्या नोटा मोजल्या गेल्या आहेत.


पंतप्रधानांनी जेव्हा नोटाबंदीची घोषणा केली होती तेव्हा तेव्हा 15.4 लाख कोटींच्या 55 आणि 1000 च्या नोटा मोजल्या गेल्या होत्या. रिझर्व्ह बँकेने माहितीच्या अधिकारात सांगितलं की, सर्व नोटांची मशीनमध्ये मोजणी सुरु आहे आणि चौकशी देखील सुरु आहे.