Viral Old British India Passport Video: इतिहासातील अनेक गोष्टी आपल्याला आजही तितक्याच आकर्षित करतात. भारतीय इतिहासाच्या पाऊलखुणाही अतिशय जाज्वल्य आहेत. समाजमाध्यमांवर अनेकदा जुन्या ऐतिहासिक गोष्टींची, वस्तूंचे, जागेचे फोटोही व्हायरल होताना दिसतात आणि आपल्या मनातील कुतूहलही जागृत होते. समाजमाध्यमांवर अशी अनेक पेजेसही आहेत जिथे स्वतंत्रपणे अशा कुतूहल वाढविणाऱ्या साहित्यांचा साठा आपल्या सहज उपलब्ध होतो. 150 वर्षे ब्रिटिशांनी भारतावर राज्य केले. 1947 साली भारत देश स्वतंत्र झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यादरम्यानचे एका व्यक्तीचे पासपोर्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसते आहे. इन्स्टाग्रामवर सध्या या व्हिडीओची बरीच चर्चा आहे. त्यावेळी पासपोर्टवर नक्की कुठला मजकूर होता यावरून नेटकऱ्यांमध्ये बरीच चर्चा रंगलेली आहे. तुम्हाला हा पासपोर्ट पाहूनही अनेक प्रश्न पडतील. 


2023 या वर्षात आता आपण आहोत. त्यामुळे हा पासपोर्ट जवळपास 1928 ते 1938 या काळात म्हणजे जवळपास 95 वर्षांपुर्वीचा आहे. असा दावा या व्हिडीओतून केला आहे. @vintage.passport.collector या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ''1928-38 मधील ब्रिटिशकालीन भारतीय पासपोर्ट. हा एका कारकुनाचा पासपोर्ट आहे. ज्याने त्या काळात इराक आणि इराणमध्ये प्रवास केला होता.'' सध्या या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी नानाविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. सगळ्यांना हा जुना पासपोर्ट पाहून अप्रुपही वाटलं आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 2.4 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. 80 हजाराहून अधिक युझर्सनी यावेळी या व्हिडीओला लाईक केले आहे. 



एका सरकारी कारकूनाचा ब्रिटिशकालीन भारतीय पासपोर्ट (फोटो सौजन्य:  @vintage.passport.collector)


समोर आलेल्या माहितीनुसार हा पासपोर्ट तेव्हाच्या सैयद मोहम्मद खलील रहमान शाह या नावाच्या एका व्यक्तीचा आहे. ही व्यक्ती त्या काळात भारतात सरकारी कारकुन म्हणून काम करत होता. या पासपोर्टवरून समजते की ते इराकवरून मध्य इराण आणि त्यावरून मग ते परत भारतात आले होते.