मुंबई : Old Cheque Book Valid News Update:आजपासून जुने चेक बुक चालणार नव्हते. मात्र, खातेदारांना बँकांना मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे आता जुने चेक बुक चालूच राहतील. या बँकांनी आपल्या खातेधारकांना दिलासा दिला आहे. आता 30 जूनपर्यंत Old Cheque Book वापरता येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाब नॅशनल बँकेने  (PNB)ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC)आणि युनायटेड बँक ऑफ इंडियामध्ये (UNI)खाते असलेल्या खातेदारांना मोठा दिलासा दिला आहे. पीएनबीने खातेधारकांच्या चेकबुकची वैधता 30 जून 2021 पर्यंत वाढविली आहे, म्हणजे या बँकांचे ग्राहक 30 जून 2021 पर्यंत त्यांचे जुने चेकबुक वापरण्यास काहीही अडचण असणार नाही. परंतु त्यांचे जुने चेकबुक 1 जुलैपासून अवैध होईल. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (Oriental Bank Of Commerce) आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया (United Bank of India)पीएनबीमध्ये (PNB) विलीन झाले आहेत.  


PNB खातेदारांना मोठा दिलासा  


दरम्यान,  सरकारने इतर बँकांमध्ये काही बँका विलीन केल्या आहेत. अशा परिस्थितीत या बँकांचे चेकबुक, पासबुक, आयएफएससी कोड बदलले जातील, ज्यामुळे त्यांची जुनी चेकबुक अवैध होईल. पण पंजाब नॅशनल बँकेने ( Punjab National Bank) कोट्यवधी ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. पीएनबीने आपल्या अधिकृत ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.


30 जूनपर्यंत जुने चेकबुक वैध  



पीएनबीने म्हटले आहे की, ई-ओबीसी / ई-यूएनआय ग्राहक कृपया शाखा, इंटरनेट बँकिंग सेवा, मोबाइल बँकिंग सेवा आणि एटीएमच्या माध्यमातून नवीन पीएनबी चेक बुक घ्या. यापूर्वी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाची (Post Dated Cheque Book)चेकबुक केवळ 30 जून 2021 पर्यंतच वैध असेल, असे पीएनबीने नमूद केले आहे.


नवीन IFSC आणि MICR जारी


या दोन्ही बँकांच्या खातेदारांसाठी पीएनबीने नवीन आयएफएससी कोड आणि एमआयसीआर जारी केला आहे. अशा परिस्थितीत, जर एखाद्या ग्राहकांना अद्याप ही माहिती मिळाली नसेल तर त्याला त्यास बँकेला एसएमएसद्वारे माहिती द्यावी लागेल.


SMS द्वारे जाणून घ्या IFSC कोड


ग्राहक त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरुन UPGR <Space><खाते क्रमांकाचे शेवटचे 4 अंक> लिहून 9264092640 वर एसएमएस पाठवू शकतात. पीएनबीशी टोल फ्री नंबर 1800-180-2222 आणि 1800-103-2222 वर संपर्क साधला जाऊ शकतो. खातेदार आपली तक्रार care@pnb.co.in वर ईमेल करूनही तक्रार नोंदवू शकतात.