Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) अनेक छुप्या कलाकारांचे व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहिलं असेल. सोशल मीडियामुळे अनेक प्रतिभावान कलाकरांना अनेकदा मोठी संधी देखील मिळाली आहे. शेंगदाणे विकणाऱ्या भुबन बड्याकार यांनी गायलेले कच्चा बदाम (kacha badam) गाणं असो की किंवा किली पॉल आणि त्याच्या बहिणीचा बॉलिवुड गाण्यांवरील डान्स. सोशल मीडियावर या कलाकारांना लोकांनी अक्षरक्षः डोक्यावर घेतलं होतं. मात्र अनेकांना संधी न मिळाल्यामुळे ते मागेच राहिल्याचे पाहायला मिळालं असेल. अशाच एका शेतात गाणाऱ्या आजीचा व्हिडीओ  सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतात काम करताना या आज्जीबाई फारच सुंदर गात असल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. या आजीने काम करता करता सूरज या चित्रपटामधील 'बहारों फूल बरसाओ...' हे गाणं गायलं आहे. त्यांचे गाणे ऐकून अनेकांनी त्यांच्या आवाजाचे कौतुक केले आहे. हा व्हिडिओ 'IPS विवेक राज सिंह फॅन' नावाच्या फेसबुक पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये हार्ट इमोजीसह 'गजब' असे लिहिले आहे. मात्र हा व्हिडीओ कुठचा आणि कधी शूट करण्यात आला याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.


कडक उन्हातमध्ये गाणी गाणाऱ्या या आजीबाईंचा हा व्हिडिओ 22 एप्रिल रोजी शेअर करण्यात आला होता. तेव्हापासून या व्हिडिओला 35 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर एक लाखाहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइक केले आहे. तसेच अनेक युजर्सही कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या ​​आहेत. एका यूजरने खूप छान आजी असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने या वयात असा आवाज अप्रतिम असे म्हटलं आहे. आणखी एका युजरने गोड आवाजासह प्रचंड आत्मविश्वास असे म्हटलं आहे.



'बहारों फूल बरसाओ...' हे गाणे 'सूरज' चित्रपटातील आहे. हा चित्रपट 1966 मध्ये आला होता आणि हे गाणे मोहम्मद रफी यांनी गायले होते. आजही अनेक जण हे गाणे गुणगुणत असतात.


ऑपरेशनदरम्यानच रुग्णाने गायलं बहारों फूल बरसाओ...


दरम्यान, सिवान जिल्ह्यातील एका हॉस्पिटलमध्ये डोळ्याच्या ऑपरेशन दरम्यान, एका रुग्णाने मोहम्मद रफीचे बहारों फूल बरसाओ मेरा मेहबूब आया है... हे गाणे डॉक्टरांना गाण्यास सांगितले होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. रुग्णाच्या डोळ्यातील मोतीबिंदूचे ऑपरेशन सुरू होते. पेशंट ऑपरेशन थिएटरमध्ये असताना तिथे गाणे गुणगुणले जात होते. तेव्हा डॉक्टर एमएम अकबर यांनी रुग्णाला तुमच्या काळातील आमच्या काळातील गाण्यात खूप अंतर आहे असे सांगितले. त्यावेळी रुग्णाने मोहम्मद रफीचे बहारों फूल बरसाओ मेरा मेहबूब आया है... हे गाणे ऐकायचे आहे असे सांगितले. त्यावेळी डॉक्टरांनी रुग्णालच हे गाणं म्हणण्यासाठी सांगितले. त्यानंतर रुग्णानेही हे गाणं म्हणण्यास सुरुवात केली.