Indian Railway Old Ticket : सोशल मीडियावर (Social Media)दररोज अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. यामध्ये व्हिडिओ आणि फोटोंचा जास्त समावेश असतो. सध्या सोशल मीडियावर जुन्या बिलांचा आणि तिकिटांचा ट्रेंड (old train ticket) सूरू झाला आहे. या ट्रेंडनूसार जुनी बिले आणि तिकिटांचे फोटो व्हायरल होत आहे. सध्या असचं एक भारतीय रेल्वेचे जुनं तिकिट व्हायरल होत आहे. या तिकिटावरील प्रवास खर्च पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान हे तिकिट सोशल मीडियावर (Social Media)व्हायरल होत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


हे ही वाचा : मुंबईच्या तरूणाचे बेलारूसच्या तरूणीसोबत लग्न,वडिल झाल्यावर सरकारने दिले 'इतके' पैसे


 


फोटोत काय? 


भारत स्वतंत्र झाला तेव्हा तिकिटाचे दर किती होते? असा प्रश्न जर विचारला तर निश्चित त्याचे उत्तर तुम्हाला देता येणार नाही. याला काही जण नक्कीच अपवाद असतील. आता याच प्रश्नाचे उत्तर देणारे एक जुना तिकिटाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे जुने तिकिट भारत-पाकिस्तान प्रवासाचे आहे. हे तिकीट पाकिस्तान रेल लव्हर्स नावाच्या युजरने फेसबुकवर शेअर केले आहे. या तिकिटाची (old train ticket) सोशल मीडियावर चर्चा आहे. 


तिकिटाचे दर किती?


सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे तिकिट 17 सप्टेंबर 1947 रोजीचे आहे. म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे हे तिकिट आहे. त्यावेळी भारत-पाकिस्तानदरम्यान (India pakistan) रेल्वेची वाहतूक सोपी होती.विशेष बाब म्हणजे त्यावेळी डिजिटायझेशन नव्हते आणि तिकिटावरील शिक्के पेन वापरून हाताने लिहिले जात होते. 


दरम्यान हे तिकिट एसी-3 कोचचे असल्याचे तिकिटात लिहिले आहे. हे तिकीट (old train ticket) रावळपिंडीहून अमृतसरला येणाऱ्या ट्रेनचे आहे. यामध्ये 9 जणांचा रेल्वेचा प्रवास खर्च फक्त 36 रुपये दाखवला आहे. म्हणजे 9 प्रवासी पाकिस्तानमधून फक्त 36 रूपयात भारतात यायचे, यानुसार एका व्यक्तीचे भाडे 4 रुपये असायचे. इतका रेल्वे प्रवास त्याकाळी स्वस्त होता. 


प्लॅटफॉर्म तिकिट प्रवासापेक्षा जास्त...


जर सध्याच्या परिस्थीतीची तुलना करायची झाल्यास, त्याकाळी ज्या 36 रूपयात भारत-पाकिस्तानात (India pakistan) प्रवास व्हायचा.तो आता खुपच महाग झाला आहे. याउलट सध्या फक्त प्लॅटफॉ़र्म तिकीटच 50 रूपये झाले आहे. म्हणजे तुम्ही समजूच शकता रेल्वेचा प्रवास या इतक्या वर्षात किती महागला आहे. 



दरम्यान हे तिकीट 17 सप्टेंबर 1947 चे आहे, त्यामुळे नेटकरी अंदाज लावत आहेत की, एक संपूर्ण कुटुंब पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झाले आहे. या स्थलांतरीत कुटूंबियांचे हे तिकिट आहे. रावळपिंडी ते अमृतसर (Rawalpindi To Amritsar)हे अंतर सुमारे 150 किमी आहे. या 150 किमीचा 9 प्रवाशांचा प्रवास खर्च फक्त 36 रूपये असल्याचे तिकिटावर लिहले आहे. त्यामुळे तिकिटावर हे दर पाहून नेटकरी आश्चर्यचकीत झाले आहेत. तसेच हे जुने दिवस आठवून पुन्हा परत यावेत अशी नेटकऱ्यांची इच्छा आहे.