मुंबई: ऑनलाइन व्यवहार करताना बरेचदा आपलाही गोंधळ होतो. एका छोट्याशा चुकीमुळे आपल्या खात्यातून पैसे जाऊ शकतात आणि त्याचा फायदा दुसरा घेऊ शकतो. तुम्हीही ऑनलाइन पेमेंट करताना फार काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. याचं कारण म्हणजे आपल्या एका चुकीमुळे समोरच्या व्यक्तीला पैसे ज्यादा मिळू शकतात. त्यामुळे असे पेमेंट करताना काळजी घेणं आवश्यक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑनलाईन मार्केट प्लेस OLX वर खरेदी आणि विक्री दोन्ही करता येते. मात्र ही खरेदी विक्री करताना फार सावधानी आणि काळजी घेणं गरजेचं असतं नाहीतर आपलीच फसवणूक होऊ शकते. फक्त OLXचं नाही तर इतर वेबसाईटबाबतही ही काळजी घेणं गरजेचं आहे. एका मुलाची हातोहात फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे तरुणाने नीट लक्ष न दिल्याने फसवला गेला आहे. 


ही घटना दिल्लीमध्ये घडली आहे. या तरुणाने आपली बाईक 18 हजार रुपयांना OLX वर विकायला काढली होती. तीन दिवसांनी त्याला एक कस्टमर मिळाला. ज्याने ही बाईक 15 हजार रुपयांना देण्याची मागणी केली. मात्र या दोघांमध्ये त्यावरून थोड्या वाटाघाटी झाल्या. अखेर 16 हजार रुपयांवर डिल झालं. त्यानंतर दुसऱ्या तरुणाने बाईक विकणाऱ्याला पैशांची जमवाजमव करण्यासाठी दोन दिवस जातील असं म्हणायचा.


वेळ उलटून गेल्यानंतर या तरुणाने आठवड्याभराचा वेळ मागितला. यावेळी बाईक विक्रेत्याने या दरम्यान ग्राहक आला तर बाईक विकण्याबाबत सांगितलं. त्यावेळी दुसरा तरुण म्हणाला की मला बाईकची गरज आहे. त्यामुळे मी तुम्हाला 2000 रुपयांचे पेमेंट करतो. मी रिक्वेस्ट टाकतो तुम्ही एक्सेप्ट करा.


या संवादानंतर बाईक विक्रेत्याने गुगल पेवर आलेली या ग्राहकाची रिक्वेस्ट एक्सेप्ट केली खरी त्यानंतर त्याने आपला नंबर टाकताच त्याच्या खात्यातून 2 हजार रुपये गेले. त्यानंतर त्याने ग्राहकाला फोन केला. मात्र फोन बंद येऊ लागला. 18 हजार तर मिळायचे राहिले पण त्याच्या खात्यातून 2 हजार रुपयेही गेले. फक्त त्याला हे माहिती नसल्याने त्याने या रिक्वेस्टवर क्लीक केली ही त्याची चूक होती. त्यामुळे त्याच्या खात्यातून पैसे गेले.