मुंबई : कायमच घरात कोणीतरी असल्यावर कधीकाळी घरातील मंडळी बाहेर गेली किंवा एकटं राहण्याची संधी ओघाओघानं केव्हा मिळालीच कर अनेकांनाच आनंद होतो. कारण त्यावेळी फक्त आणि फक्त आपलीच मनमर्जी असते. कोणाचीही ढवळाढवळ नसते. एकटं असताना आपल्या परिनं वेळ व्यतीत करण्याचा प्रत्येकाचाच आपला असा फंडा असतो. बहुतांश मुली हा वेळ नेमका काय करण्यात व्यतीत करतात हेसुद्धा एकदा पाहाच...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाहेर वावरत असताना साचेबद्ध कपडे घालणाऱ्या अनेकजणी घरात एकटं असताना शक्य तितके सैल आणि वाढत्या अंगाचे कपडे घालतात. काहीजणी या मोकळ्या वेळात त्यांच्या एक्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही नजर टाकतात. तर काही मुली त्यांच्या स्वप्नातील राजकुमारासोबतच्या दुनियेत फेरफटका मारत असतात. 


काही मुली एकट्या असताना बेफाम नाचतात. कशाचीही तमा न बाळगता आवडत्या गाण्यांवर त्या ठेका धरतात. घरावर किंवा जिथे आहोत तिथे आपलंच राज्य असल्यामुळं या वेळी सेल्फ ग्रुमिंगला प्राधान्य देतात. तर काही मुली कोणी बोलणारं नसल्यामुळं अंघोळच करत नाहीत. 


कपड्यांच्या पेटीत असणारे जुने कपडे वापरुन पाहणं, असं अनेक मुली करताना दिसतात. आपलं वजन वाढलं तर नाही ना हेच पाहण्यासाठी हे सारे प्रयत्न असतात. या साऱ्यापलीकडे काही मुली एकटं असताना अडल्ट फिल्मही पाहतात, हो पण जाहीरपणे याचा स्वीकार मात्र त्या करताना दिसत नाहीत. मुलींचे स्वभाव, त्यांच्या आवडीनिवडी या साऱ्यावरच त्या एकटं असताना नेमकं काय करतात हे अवलंबून असतं. मुलांच्या बाबतीत ही समीकरणं पूर्णपणे वेगळी असल्याचं पाहायला मिळतं.