भिलवाडा : रस्त्यावर उभं राहून गप्पा मारणं महागात पडू शकतं. बऱ्याचदा आपला हलर्जीपणा नडतो. उजव्या बाजूनं उतरणं, रस्त्याच्या मधोमध उभं राहून बोलणं असो किंवा फोनवर बोलणं असो असे पराक्रम जीवावर बेतू शकतात हे माहीत असतानाही बऱ्याचदा अशा गोष्टी लोकांकडून होतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रस्त्यावर उभं राहून एक तरुण गप्पा मारत राहिला आणि त्याचाच गेम झाला. भरधाव गाड्या आजूबाजूने जात असतानाही रस्त्याच्या मधोमध गप्पा मारणं तरुणाला चांगलंच महागात पडलं. संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की तरुण रस्त्याच्या मधोमध उभं राहून गप्पा मारत आहे. आजूबाजूने भरधाव गाड्या जात आहे. तरीही जागचा बाजूला होत नाही. एक भरधाव बस या तरुणाल 20 फुटापर्यंत लांब चिरडत घेऊन जाते. या संपूर्ण घटनेनंतर बसचालक फरार झाला आहे. 


ही धक्कादायक घटना राजस्थान जिल्ह्यातील भीलवाड़ा भागात धक्कादायक घटना समोर आली आहे. भररस्त्यात दोन मित्रा गप्पा मारत राहिले आणि भरधाव बसने एकाला धडक दिली. या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्ती भीलवाडा इथल्या ऑटोमोबाइल कंपनीचा मॅनेजर आहे.