नवी दिल्ली : बऱ्याचदा आपण मोबाईलमध्ये एवढे दंग होतो की आजूबाजूच्या परिस्थितीचं भानही राहात नाही. मोबाईलमुळे एवढं वेड लागलं आहे की रस्त्यावरून जाताना किंवा रेल्वे ट्रॅकवरही त्याचा वापर कमी होत नाही. त्यामुळे बऱ्याचदा अपघात होण्याचा धोका असतो किंवा होतात ही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मोबाईलमध्ये डोकं खुपसून चालत असल्याचं दिसत आहे. त्याला आजूबाजूचं भान राहात नाही. तो चालत राहातो. मोबाईलमध्ये लक्ष असल्याने अचानक तो मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवरून रुळावर पडतो. 


सुदैवानं तिथे सीआयएसएफ जवान हे सगळं पाहतात. त्याच वेळी जवान या तरुणाचे प्राण वाचवतात. जवानांच्या हजरजबाबीपणामुळे या तरुणाचे प्राण वाचले आहेत. नाहीतर मोठा अनर्थ घडला असता. बरं खाली पडल्यानंतरही या तरुणाला काही सेकंद भान नसतं. 


ही धक्कादायक घटना दिल्ली मेट्रो स्थानकातील असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचा व्हिडीओ सीआयएसएफ जवानांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. तुम्हालाही जर अशी सवय असेल तर ती घातक आहे. त्यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो.