मुंबई : उन्हाळा सुरु झाला की फळांचा राजा आंब्याचा सीझन सुरू होतो. आंबा म्हटलं की कोणाच्या तोंडाला पाणी सुटत नाही असं नाही. अगदी लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच आंबा आवडतो. अनेकदा तर कैऱ्याही दगडाने चोरून किंवा अशाच पाडून खाण्याची मजा वेगळीच असते. पण असा एक आंबा आहे ज्याला झेड प्लस सुरक्षा मिळाली आहे. ही सुरक्षा तोडून जाण्याची कोणी हिंमतही करणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झाडावरून आंबा तोडून किंवा दगडाने पाडून खाण्याची मजा काही वेगळीच असते. मात्र या आंब्याला झेड प्लस सुरक्षा आहे. त्यामुळे या झाडाचे आंबे तोडून किंवा पाडून खाण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही. याचा एक फोटो सोशल मीडियावर सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. 


नेमकं काय आहे प्रकरण? 
घराजवळ एक-दोन आंब्याची झाडं लावली जातात. काही जणांकडे तर आंब्याच्या बागा देखील असतात. सध्या एक अजब फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये आंब्याला झेड प्लस सुरक्षा असल्याचं दिसत आहे. त्यामुळे या झाडाचे आंबे काढायला कोणी जाणार नाही. 


या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की आंब्याच्या झाडाला खोडापासून वरपर्यंत मधमाशांचं पोळं आहे. या पोळ्यावर आंबे लगडले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही झेड प्लस सुरक्षा माणसांची नाही तर निर्सगानं दिलेली आहे. आंबा काढायचा तर कसा हा प्रश्न हा फोटो पाहून अनेकांना पडू शकतो. 


मधमाशांच्या पोळ्याला जराही धक्का लागला तरी खूप मोठा अनर्थ होऊ शकतो. त्यामुळे या झाडाकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची कोणाची हिंमत होणार नाही. या झाडाचे आंबे काढणंही फार कठीण आहे. 


या व्हायरल फोटोमध्ये मधमाशा आंब्याचं संरक्षण करत असल्याचं दिसत आहे. ipsvijrk नावाच्या ट्वीटर हॅण्डलवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोला आंब्यासाठी झेड प्लस सुरक्षा असं कॅप्शनही देण्यात आलं आहे.