मुंबई : काळी आणि वेळ कधी कुठे कशी येईल सांगता येत नाही. त्यामुळे मिळालेलं आयुष्य रोज छान जगता येईल याचा प्रयत्न करायला हवा. सोशल मीडियावर एक थरारक व्हिडीओ व्हायरल होत आहे. आनंदाच्या उत्साहावर या व्हिडीओनं विरजण घातलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ एक सेकंदासाठी अंगावर शहारे आणतो. या व्हिडीओमध्ये पाहू शकता वृद्ध व्यक्ती आनंदाने डान्स करत आहे. त्यांना उत्साह आणि डान्स दोन्ही पाहून एक क्षण आनंद होतो. मात्र दुसऱ्या क्षणी त्यांना काहीतरी होतं. ते खाली बसतात आणि जागीच जीव सोडतात. 


डान्स करता करता त्यांनी जीव सोडल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यांना आजूबाजूचे लोक सावरायला जातात. तिथे व्हिडीओ संपतो. अनेक युजर्सनी या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. काही लोकांनी त्यांना हार्ट अॅटेक आल्याचं सांगितलं आहे.


काही लोकांच्या म्हणण्यानुसार जोरात वाजणारी गाणी ही देखील हार्ट अॅटेकचं कारण असू शकतात. त्या आवाजाचा त्रास होऊ शकतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओची झी 24 तास कोणतीही पुष्टी करत नाही. हा व्हिडीओ कुठला आहे याची माहिती मिळू शकली नाही.