मुंबई: महाराष्ट्राशेजारी राज्यात म्हणजेच कर्नाटकात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ आता महाराष्ट्रा शेजारील आणखी एका राज्यात ओमिक्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण 38 देशांमध्ये आढळले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात आता गुजरातमध्ये देखील ओमिक्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राजवळ ओमिक्रॉनचे रुग्ण आढळत असल्याने प्रशासन अलर्टवर आहे. महाराष्ट्राचंही टेन्शन वाढलं आहे. याचं कारण म्हणजे 9 संशयित ओमिक्रॉनचे रुग्ण आहेत. त्यांचे रिपोर्ट येणं बाकी आहे.


दुसरीकडे आफ्रिकन देशातून बंगळुरूत आलेले 10 जण गायब झालेत. या 10 जणांचा ठावठिकाणा नाही, त्यांचे मोबाईल फोन बंद आहेत. कर्नाटकात दोन ओमिक्रॉनग्रस्त आढळल्यावरही या बेपर्वाई केल्यानं प्रचंड टीका होत आहे. 


आरोग्य अधिकारी या 10 जणांचा शोध घेत आहेत. कर्नाटकात दक्षिण आफ्रिकेतून 57 जण आले होते. त्यातले 10 जण गायब झाल्याचं आढळलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र प्रशासनही अलर्टवर आहे. 


ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे एकही मृत्यूची आतापर्यंत नोंद नसल्याचं WHO नं स्पष्ट केलं आहे. ओमिक्रॉनमुळे कोरोनाची तिसरी लाट येईल, असं भाकीत अनुराग अग्रवाल यांनी केलं आहे. मुंबईसह महाराष्ट्रात सध्या ओमिक्रॉनमुळे प्रशासन यंत्रणा सतर्क झाली आहे.