Omicron च्या नवीन व्हेरिएंटने वाढवली डोकेदुखी, किती जीवघेणा; जाणून घ्या काय आहेत लक्षणे?
Coronavirus Omicron XBB.1.16: कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. रुग्णसंख्येत नव्याने वाढ होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. Omicron चा नवीन प्रकार XBB.1.16 याने टेन्शन वाढवले आहे. देशातील कोरोना विषाणूच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे कारण असल्याचे मानले जात आहे.
Coronavirus Omicron XBB.1.16: कोरोनाचा धोका वाढत आहे. कोरोनाची रुग्णसंख्या देशात वाढत आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्क वापरण्याची सूचना आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे. भारतात पुन्हा एकदा कोरोनाव्हायरसचा संसर्ग वाढत आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये कोविड-19 च्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आलेख वैद्यकीय तज्ज्ञांचे टेन्शन वाढवत आहे. मंगळवारी 24 तासांत देशभरात 699 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर सोमवारी (21 मार्च) 918 जणांना संसर्ग झाला. Omicron चे नवीन प्रकार XBB.1.16 (Omicron XBB.1.16)हा या वाढीचे कारण सांगण्यात येत आहे.
XBB.1.16 ची किती रुग्ण आणि कोणत्या राज्यात धोका?
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Omicronच्या नवीन प्रकार XBB.1.16 (Omicron XBB.1.16) याने आरोग्य यंत्रणेची झोप उडवली आहे. या नवीन प्रकार जास्त संसर्गजन्य असल्याने याचा धोका अधिक आहे. कर्नाटकमध्ये आतापर्यंत या प्रकाराचा धोका वाढला आहे. कारण येथे सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. या राज्यात 30 रुग्णांना याची लागण झाली आहे. त्याचवेळी, महाराष्ट्रात 29, पुद्दुचेरीमध्ये 7, दिल्लीत 5, तेलंगणात 2 गुजरात, हिमाचल प्रदेश आणि ओडिशामध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे नवीन रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
Omicron XBB.1.16 किती धोकादायक ?
Omicron XBB.1.16 हा नवीन व्हेरिएंट हा धोकादायक आहे. याचा विचार करता तो जास्त संसर्ग करु शकतो. हा कोरोना विषाणूच्या Omicron चा उप-प्रकार आहे आणि तो वेगाने वाढत आहे. त्यामुळे धोकादायक असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की हे ओमिक्रॉनमधील जुन्या प्रकारांमधून पुन्हा तयार झाले आहेत. हा नवीन प्रकार प्रतिकारशक्ती कमी करत आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढीचा जास्त धोका आहे. XBB.1.16 (XBB.1.16) मध्ये काही अतिरिक्त स्पाइक उत्परिवर्तन आहेत. त्यामुळे तो जास्तच धोकादायक आहे.
XBB.1.16 या व्हेरिएंटची लक्षणे
हा नवा व्हेरिएंट धोकादायक आहे. डॉक्टरांनी सांगितले आहे की, आतापर्यंत Omicron XBB.1.16 प्रकाराने (Omicron XBB.1.16) संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये कोणतीही गंभीर समस्या दिसली नाही. त्याच्या सामान्य लक्षणांमध्ये नाक बंद होणे किंवा चोंदणे, डोकेदुखी आणि घसा खवखवणे यांचा समावेश होतो. याशिवाय ताप आणि स्नायू दुखण्याची समस्या असू शकते. ही लक्षणे किमान तीन ते चार दिवस राहतात. डॉक्टरांनी सांगितले आहे की, जर अशी लक्षणे तुमच्यामध्ये दिसली तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन स्वतःची तपासणी करा.