ओमायक्रोनचा बॉम्बगोळा, एकाचवेळी तामिळनाडूत 33 नवीन रुग्ण
Omicron Coronavirus : देशात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रोनचा संसर्ग सातत्याने वाढत आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत आहे.
चेन्नई : Omicron Coronavirus : देशात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रोनचा संसर्ग सातत्याने वाढत आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत आहे. ओमायक्रोनचा बॉम्बगोळाच फुटला आहे. तामिळनाडूत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तामिळनाडूत एकाचवेळी ओमायक्रोनचे 33 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, कोलकात्यात 29 विद्यार्थी कोरोना बाधित झाले आहेत.
पुन्हा कोरोनाचा धोका वाढताना दिसत आहे. आज केंद्र सरकारने तातडीने महत्वाची बैठक बोलावली आहे. ओमायक्रोनचा धोका वाढत असल्याने ही बैठक बोलावण्यात आली आहे. त्यावेळी तामिळनाडूमध्ये ओमायक्रोनचा स्फोट झाला आहे.
तामिळनाडूत Omicron चे 33 नवीन रुग्ण आढळले आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री एम. सुब्रमण्यम यांनी याबाबत माहिती दिली आहे. राज्यात ओमायक्रोनच्या एकूण रुग्णाची संख्या 34 झाली आहे. यापूर्वी केंद्राने सकाळी जाहीर केलेल्या यादीत तामिळनाडूनत फक्त 1 रुग्ण असल्याचा उल्लेख केला होता. मात्र, काहीच वेळात 33 नवीन रुग्ण असल्याचे पुढे आले आहे.
दरम्यान, एकाचवेळी 33 रुग्ण सापडल्याने या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे. काहींचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचवेळी नागरिकांनी घाबरू नये. कोरोनासंबंधी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव राधाकृष्णन यांनी सांगितले.
शाळेत कोरोनाचा शिरकाव, 29 मुले बाधित
त्याआधी पश्चिम बंगालमधील शाळेत कोरोनाचा स्फोट झाला आहे. एका शाळेतील 29 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. पश्चिम बंगालमधील कल्याणी येथील जवाहर नवोदय विद्यालयातील 9 वी आणि 10 वी च्या एकूण 29 विद्यार्थ्यांना कोरोना झाला आहे.