ओमायक्रॉन संकट : 40+ वयोगटातील नागरिकांना बुस्टर डोस !
Omicron Variant : ओमायक्रॉन संकटाच्या पार्श्वभूमीवर 40 आणि त्यापुढील वर्षांच्या नागरिकांना बुस्टर डोस द्या, अशी मागणी करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : Omicron Variant : ओमायक्रॉन संकटाच्या पार्श्वभूमीवर 40 आणि त्यापुढील वर्षांच्या नागरिकांना बुस्टर डोस द्या, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत देशातील वरिष्ठ शास्त्रज्ञांनी तशी केंद्र सरकारला शिफारस केली आहे. शास्त्रीय सल्ल्यानंतर बुस्टर डोसचा निर्णय होईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे. दरम्यान, ओमायक्रॉनमुळे 40 वर्षांवरील नागरिकांसाठी बूस्टर डोसची शिफारस केल्याचे सांगण्यात येत आहे.
देशातल्या 40 वर्षांच्या पुढील नागरिकांना बूस्टर डोस देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन या म्युटेशनच्या पार्श्वभूमीवर हा सल्ला देण्यात आला आहे. जिनोम सिक्वेन्सिंग करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञांच्या टीमने 29 नोव्हेंबरच्या साप्ताहिक वार्तापत्रात याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
संसर्गाचा धोका असलेल्यांना प्राधान्य देत 40 वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस देण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. लोकसभेतही कोरोना चर्चेदरम्यान अनेक खासदारांनी बूस्टर डोस देण्याची मागणी केली होती. मात्र हा निर्णय शास्त्रीय सल्ल्लानंतरच होईल, असे स्पष्टीकरण आरोग्यमंत्र्यांनी दिले आहे.