मुंबई : यंदाचा स्वातंत्र्य दिन खूप खास असणार आहे, कारण 15 ऑगस्टच्या सकाळी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून तिरंगा फडकवत असतील तेव्हा आकाशातून फुलांचा वर्षाव होईल. संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, भारतीय हवाई दलाची Mi-17 1V हेलिकॉप्टर प्रथमच  कार्यक्रमाच्या ठिकाणी फुलांचा वर्षाव करणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑलिम्पियन देखील उपस्थित राहतील


खरं तर, यावेळी टोकियो ऑलिम्पिक आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) च्या पदक विजेत्यांना लाल किल्ल्यावर आयोजित समारंभात सहभागी होण्यासाठी  आमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी ऑलिम्पिकमधील सर्व खेळाडूंना आमंत्रित करण्यात आले आहे. ज्यात जॅवलीन थ्रो करुन भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा  नीरज चोप्रा यांचा देखील समावेश आहे.


सुमारे 240 ऑलिम्पियन, सहाय्यक कर्मचारी, एसएआय आणि क्रीडा महासंघाच्या अधिकाऱ्यांनाही तटबंदीसमोर शोभा वाढवण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.


 लाल किल्ल्यावर असा पार पडणार स्वातंत्र्यदिन 


मंत्रालयाने आपल्या निवेदनात लाल किल्ल्यावर आयोजित केलेल्या समारंभाविषयी सविस्तर माहिती दिली आहे, ज्यात लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या आगमनावेळी  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट आणि संरक्षण सचिव डॉ. असणार आहेत.


कोविड-19शी लढण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या कोरोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ लाल किल्ल्याच्या तटबंदीच्या दक्षिण बाजूस एक स्वतंत्र ब्लॉक बांधण्यात  आल्याचेही सांगण्यात आले.


यानंतर, संरक्षण सचिव जनरल ऑफिसर कमांडिंग (जीओसी), दिल्ली क्षेत्र, लेफ्टनंट जनरल विजयकुमार मिश्रा यांची पंतप्रधानांना ओळख करून देतील. यानंतर,  दिल्ली क्षेत्राचे जीओसी मोदींना सलामीच्या तळावर घेऊन जातील, जिथे संयुक्त आंतरसेवा आणि दिल्ली पोलीस गार्ड पंतप्रधानांना सामान्य सलामी देतील. यानंतर,  पंतप्रधान गार्ड ऑफ ऑनरची पाहणी करतील.


हे लक्षात घेण्यासारखे आहे की पंतप्रधानांसाठी सलामी देण्यासाठी  गार्ड ऑफ ऑनरमध्ये एक अधिकारी आणि लष्कर, नौदल, हवाई दल आणि दिल्ली पोलिस  विभागातील 20-20 कर्मचारी असतील. यानंतर, गार्ड ऑफ ऑनरच्या तपासणीनंतर पंतप्रधान मोदी लाल किल्ल्याच्या तटबंदीसाठी रवाना होतील.


स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रपतींनी 144 शौर्य पुरस्कारांना मान्यता दिलीय. 1 अशोक चक्र, 1 किर्ती चक्रा, 15 शौर्य चक्र, 4 बार सेना मेडल, 116 सेना मेडल, 5 नौसेना मेडल, 2 वायूसेना मेडल यांची घोषणा करण्यात आलीय. आज या सोहळ्याला ऑलिम्पिक पदक विजेते आणि खेळाडू विशेष अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत. या सोहळ्याची प्रत्येक बातमी आपण झी 24 तासवर पाहणार आहोत. 


जिथे त्यांचे संरक्षण  मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत, लष्कर प्रमुख जनरल एम.एम. नरवणे, नौदल प्रमुख  अॅडमिरल करमबीर सिंह आणि हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल आर.के.एस. भदौरिया करतील.