माधोपूर : जन्म आणि मृत्यू कुणासाठीही थांबत नाही. पण एखादी अशी घटना घडते तेव्हा सगळेच हतबल होतात. अशीच एक घटना बुधवारी सकाळी राजस्थानच्या माधोपूर येथे घडली. रमेश चंद्र यांच्या मुलीच्या लग्नासाठी येणाऱ्या नातेवाईकांची बस नदीत कोसळल्याने 24 लोकांचा मृत्यू झाला. लग्न समारंभात पूर्णपणे गुंग असलेल्या नवरी मुलीला आणि तिच्या आईला या दुर्घटनेच्या माहितीची भनकही न लागू देता बापाने हे दुःख मनात दाबून ठेवलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी संध्याकाळी रमेश यांच्या मुलीचं लग्न मॅरिज गार्डन येथे होणार होतं. नवरी मुलगी आई-वडिल लग्नाकरता सकाळीच गेले होते. पण नवरी मुलीचे मामा-मामी, आजी-आजोबा आणि इतर नातेवाईक मागच्या बसमधून येत होती. ही बस मेज नदीमध्ये कोसळली आणि 27 जणांपैकी 24 जणांचा जागीच मृत्यू झाला. 


एका बाजूला मुलीच्या लग्नाची धामधूम सुरू असताना जवळच्या नातेवाईकांना गमावल्याचं दुःख मुलीच्या बापाने मनात दाबून ठेवलं. अपघाताचं दुःख ऐकून रेमश सुन्न अवस्थेत होते. पण उरलेल्या नातेवाईकांनी रमेश यांना धीर देत मुलीचं लग्न पहिलं लावून घ्या असा सल्ला दिला. 


मुलीचं लग्न व्यवस्थित पार पडे पर्यंत अपघाताची दुर्घटनेची माहिती लपवण्यात आलं. अपघाताची माहिती कळताच अनेक पत्रकार या विवाह सोहळ्याच्या ठिकाणी पोहोचले. तेव्हा रमेश यांनी सगळ्यांना विनंती केली की, या घटनेबद्दल माझ्या कुटुंबियांना काहीच माहिती नाही. कृपा करून तुम्ही इथे कुणाला काही विचारू नका. जसं आपल्या मुलीचं लग्न पार पडलं. आणि तिची पाठवणी केली तसा मात्र त्यांच्या भावनांचा बांध फुटला आणि ते कोसळले.