मुंबई :  आताच्या धकाधकीच्या जीवनात व्यक्त होण्याचा मार्ग म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडियावर प्रत्येक वेळेस कोणतीतरी नवीन गोष्ट व्हायरल होत असते. काही गोष्टी आनंद देवून जातात. तर काही  अगदी थक्क करणाऱ्या असतात. पण आता जो व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो माणसाला माणूसकी शिकवणारा आहे. व्हिडिओमध्ये महिला रस्त्यावरून जात आहे. तेव्हा तिला एक कासव रस्त्यावर दिसतो. त्यानंतर महिलेने  जे केलं ते खरंच कौतुकास्पद आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्या महिलेने त्या कासवाला उचललं आणि रस्त्याच्या कडेला आणलं. आजू-बाजूने अनेक गाड्या जात आहेत. त्यामुळे त्या लहान कासवाचा जीव देखील गेला असता. पण महिलेने कासवाला जीवनदान दिलं असं म्हणणं वावगं ठरणार नाही. महिलेने जे काही केलं आहे. तो एक उत्तम आणि खूप काही शिकवणारा दाखला आहे. हा व्हिडिओ प्रत्येकाने पाहिलाचं पाहिजे. 


सोशल मीडियावर हा व्हिडिओ ‘not all heroes wear capes’नावाच्या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 50 हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. तर 1 हजारपेक्षा जास्त लोकांनी व्हिडिओला लाईक केलं आहे.