केरळ : केरळमधील 3 वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याच समोर आलं आहे. नुकताच इटलीहून प्रवास करून आलेल्या या तीन वर्षांच्या मुलाची कोरोना व्हायरस टेस्ट पॉझिटीव आली आहे. पुढील उपचाराकरता या मुलाला एर्नाकुलम मेडिकल कॉलेजमध्ये आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे. आतापर्यंत भारतात कोरोनाच्या रूग्णांचा आकडा 40पर्यंत गेला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी कोरोना व्हायरसची लागण झालेल्या पाच लोकांची माहिती समोर आली होती. केरळचे आरोग्यमंत्री के.के.शैलजा यांनी रविवारी माहिती दिली की,'कोरोना व्हायरसने 5 नव्या पॉझिटीव रूग्णांना आयसोलेशन वॉर्डमध्ये भर्ती करण्यात आलं आहे.' नुकतेच केरळमधील तीन लोकं इटलीहून परतले. पतनमथिट्टा जिल्ह्यातील दोन लोकांना या आजाराची लागण झाली आहे. (केरळमध्ये पाच जणांना कोरोना) 


 



केरळमध्ये देखील कोरोनाचे ५ रुग्ण अढळले आहेत. त्यामुळे आता भारतात देखील सर्वत्र कोरोनाची भीती दिसत आहे. भारतात कोरोना रूग्णांची संख्या ३९ पर्यंत पोहोचली आहे. तर कोरोना व्हायरसमुळे आता धुळवडीचा रंग बेरंग होताना दिसत आहे. केरळच्या आरोग्य मंत्री के.के. शैलजा यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. हे रूग्ण भारतातले नसून त्यांच्यावर उपचार देखील सुरू असल्याचं त्यांनी संगितलं आहे.