नवरी १, तरीही २ नवरदेव वरात घेऊन आल्याने नवरीला आनंद, पुढे काय झालं.. तुम्ही कल्पनाच करु शकत नाही
कन्नौजच्या ककलापुरमध्ये एक नवरदेव आपल्या कुटूंबीयांसोबत वरात घेऊन नवरीच्या घरी पोहोचला. लग्नानाच्या रिती सुरु झाल्यानंतर थोड्या वेळातच नवरीचा प्रियकर वरात घेऊन तिच्या घरी पोहोचला.
कन्नौज : एक नवरी आणि २ घोड्यावर २ नवरदेव वरात घेऊन आले,नक्की काय घडले हे लग्नात उपस्थित लोकांना कळायला मार्ग नव्हता. त्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आले आणि कित्येक तासांच्या बोलण्यानंतर अखेर यावर त्यांनी तोडगा काढला. यूपीमधील कन्नौज शहरात एक आगळी वेगळी घटना घडल्याचे समोर आले आहे. कन्नौजमधील ककलापूर गावात रहाणाऱ्या वधूच्या घरात दोन नवरदेव वरात घेऊन पोहोचले ज्यामुळे दोन्ही घरांमध्ये वाद सुरु झाला.
कन्नौजच्या ककलापुरमध्ये एक नवरदेव आपल्या कुटूंबीयांसोबत वरात घेऊन नवरीच्या घरी पोहोचला. लग्नानाच्या रिती सुरु झाल्यानंतर थोड्या वेळातच नवरीचा प्रियकर वरात घेऊन तिच्या घरी पोहोचला. एकाच घरात दोन वरात आल्यामुळे गावची सगळी मंडळी आश्चर्यचकित झाली. परंतु नवरीला मात्र या सगळ्या प्रकरणामुळे फार आनंद झाला.
प्रियकराची वरात आल्यानंतर.....
घरच्यांच्या आणि नातेवाईकांच्या सम्मतीने जमलेलं हे लग्नं ठरल्याप्रमाणे पार पडत होतं. परंतु जेव्हा नवरीचा प्रियकर वरात घेऊन नवरीच्या दारी आला, त्यानंतर नवरी लग्नाला नकार द्यायला लागली.
हे सगळ पाहिल्यानंतर घटनास्थळी असलेले सगळेच लोकं चकीत झाले. त्यानंतर जमलेल्या लोकांपैकी कोणीतरी पोलिसांना या घटनेबाबत कळवले. त्यामुळे लगेचच पोलिसही त्या लग्नमंडपात पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी नवरीला आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आणि दोन्ही पक्षांमध्ये बोलणी सुरु झाली.
लोकांना आणखी एक धक्का बसला
जेव्हा या दोन्ही पक्षांमध्ये बोलणी सुरु झाली, तेव्हा लोकांना आणखी एक धक्का बसला. त्या बोलणी दरम्यान एक धक्कादायक गोष्ट समोर आली की, नवरीच्या प्रियकराचे लग्न आधीच ठरलं होतं आणि तो त्याच्या होणाऱ्या नवरीसोबत त्या मंडपात वरात घेऊन आला होता. त्याचं लग्नही आज होणार होतं. त्यानंतर त्यांच्यात एक करार झाला, कराराप्रमाणे प्रेयसीच्या घरच्यांनी लग्न ठरलेल्या नवरदेवाला त्यांचा सगळ्या वस्तू परत केल्या.
त्या नवरदेवाने ही त्या मुलीकडच्यांकडून घेतलेली बाईक परत केली. त्यानंतर नवरीच्या प्रियकराने त्याचे लग्न ठरलेल्या मुलीलाही सगळ्या वस्तू परत केल्या आणि हे सगळे प्रकरण शांतपणे सोडवले. त्यानंतर त्या प्रियसीचे तिच्या प्रियकरा सोबत लग्न झालं.
नवरदेवही विना लग्नाचा परतला नाही
प्रियसीचं लग्न प्रियकरासोबत झाल्यानंतर नवरदेवाची घरची मंडळी हताश झाले. परंतु प्रियकरासोबर लग्न ठरलेल्या नवरीच्या घरच्यांनी त्या नवऱ्याकडच्या लोकांसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर नवरदेवाच्या घरच्यांनीही हा प्रस्ताव मान्य केला आणि एकाच मांडवात दोन लग्न पार पडले.