नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे दिल्लीत अतिशय चिंताजनक वातावरण आहे. दिल्लीत प्रत्येक दिवशी कोरोना रुग्णांची संख्या सतत चढत्या क्रमावर आहे. गुरूवारी दिल्लीमध्ये ६५ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. याठिकाणी २५ मिनिटाला एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीत कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी ४ स्मशानघाट आणि २ कब्रस्तानची व्यवस्था करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसरीकडे दिल्लीतील सर्वात मोठा बाजार म्हणून ओळखला जाणारा खारी बावली मार्केट मध्ये तब्बल १०० व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. शिवाय त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्ती देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. त्यामुळे दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. 


दरम्यान, खारी बावली मार्केटमध्ये मसाल्याचे पदार्थ आणि इतर आवश्यक वस्तूंचा बाजार भरतो. त्यामुळे लॉकडाऊन काळातही आवश्यक वस्तूंसाठी हा मार्केट सुरू ठेवण्याक आला होता. आता मार्केटमधील व्यापारीच कोरोना ग्रस्त झाल्यामुळे संपूर्ण दिल्लीत भीतीचे वातावरण पसरले आहे. 


धक्कादायक म्हणजे , भारतात कोरोनाचे २,९७,२०५ रुग्ण आहेत. आता भारत जगातील चौथा सर्वाधिक प्रभावित देश ठरला. एका दिवसात भारताने स्पेन आणि ब्रिटनला मागे टाकले आहे. याआधी भारताने चीनलाही मागे टाकले होते. दिल्लीत ३२८१० संसर्ग झालेल्यांची संख्या आहे.