VIDEO : एक नवरा, दोन बायका! नवऱ्यासोबत राहण्यासाठी भररस्त्यात दोघींचा High Voltage Drama
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका नवऱ्यासाठी दोन बायका एकमेकांशी भांडताना दिसतं आहेत.
Viral Video : सोशल मीडिया असंख्य व्हिडीओचा खजिना आहे. इथे प्रत्येक सेकंद सेकंदला कुठलाना कुठला व्हिडीओ अपलोड होत असतो. काही व्हिडीओ हे मनोरंजक असतात तर काही धक्कादायक. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्याने कुठलीही गोष्ट, घटना मोबाईल कॅमेऱ्याच्या नजरेतून लपू शकत नाही. सोशल मीडियाचं जग हे एक माया जाळ आहे. जिथे प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील अगदी खाजगी क्षणही पब्लिक करुन टाकतात. नवरा बायको असो किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असो यांचे लाखो व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहिला मिळतात. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एका नवऱ्यासाठी दोन बायका भररस्त्यात राडा करत आहेत. (One husband two wives High Voltage Drama fight video viral on Internet trending)
एक नवरा, दोन बायका!
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @gharkekalesh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवर जोरदार व्हायरल होतो आहे. या धक्कादायक व्हिडीओमध्ये एका नवऱ्यासाठी तिच्या दोन बायका हाणामारी आणि वाद घालताना दिसत आहे. हा High Voltage Drama पाहण्यासाठी बघ्याने गर्दी केली. त्यातील एका व्यक्ती हा High Voltage Drama त्याच्या मोबाईलमध्ये कैद केला. यात त्या दोन महिला एकमेकांचे केस ओढताना आणि हाणामारी करताना दिसत आहे. या दोघांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न त्या दोघींचा नवरा करतोय. पण त्या दोघी कोणालाही ऐक नाही आहे. धक्कादायक म्हणजे हा सगळा प्रकार दोन चिमुकली मुलं पाहत आहेत.
आई वडिलांचं भांडण पाहून ती मुलं घाबरलेली या व्हिडीओमध्ये दिसत आहे. ती चिमुकली रडताना दिसत आहेत. तो माणूस त्या दोघींना शांत राहण्यासाठी सांगतो पण त्या काही ऐकायला तयार नसतात. तो त्या दोघींपैकी एकीला ऑटो रिक्षामध्ये जबरदस्ती ओढताना दिसत आहे. पण ती महिला पुन्हा बाहेर येत त्या महिलेला शिवीगाळ करु लागली. अखेर त्या दोन्ही बायको ऑटो रिक्षामध्ये बसल्या त्यांचा नवरा आणि दोन चिमुकलीही त्यात बसली. त्यानंतर ते तिथून निघून गेलीत. हा व्हिडीओ भारतातील कुठल्या तरी शहरातील आहे. मात्र या घटना आणि शहराबद्दल काही पुष्टी झालेली नाही. गेल्या काही वर्षांपासून नवरा बायको आणि विवाहबाह्य संबंध यांचं प्रमाण वाढलेलं दिसत आहे. नात्यांमधील विश्वास आणि प्रेम हरवत चाले आहे.