One Night In Jail: एखाद्या व्यक्तीनं गुन्हा केल्यानंतर त्याची रवानगी थेट तुरुंगात होते. या जगात कोणत्याही व्यक्तीला तुरुंगात जावंसं वाटत नाही. तुरुंगवास हा त्या त्या शिक्षेनुसार ठरतो. त्यामुळे तुरुंगवास म्हंटलं पायाखालची वाळूच सरकते. उत्तराखंडमधील एका तुरुंगाने अनोखी ऑफर दिली आहे. ही ऑफर उत्तराखंडच्या हल्दवानी जेल प्रशासनाकडून लोकांना दिली जात आहे. लोकांना 500 रुपये प्रति रात्र शुल्क देऊन तुरुंगातील वास्तविक जीवनाचा अनुभव दिला जाईल. तुरुंगातील जीवन कसं असतं आणि लोकांना वाईट कर्मापासून वाचवणे हा यामागचा उद्देश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही लोकांच्या कुंडलीतील ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती पाहून ज्योतिषी भाकीत करतात की त्यांना आयुष्यात एकदा तरी तुरुंगात जावे लागेल. अशा लोकांसाठी ही ऑफर नक्कीच कामाची आहे, असं म्हणायला हरकत नाही. अशा लोकांसाठी जेलचा एक भाग तयार केला आहे, जिथे लोक 500 रुपयांमध्ये एक रात्र काढू शकतील.


मिळालेल्या माहितीनुसार, हल्द्वानीचा हा तुरुंग 1903 मध्ये बांधण्यात आला होता. यात सहा कर्मचारी निवासस्थानांसह जुन्या शस्त्रागाराचा एक भाग आहे. तुरुंग प्रशासनाने प्रसारमाध्यमांना सांगितले की, तुरुंगातील सोडलेला भाग पाहुण्यांसाठी  तयार केला जात आहे. कुंडलीत बंधन योग असल्यामुळे काही लोकांना ज्योतिषी रात्र तुरुंगात घालवण्याचा सल्ला देतात. आमच्याकडे तुरुंगात एक भाग आहे ज्याला डमी जेल म्हणता येईल. आम्ही अगदी तुरुंगासारखं तयार केले आहे.