मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाचीची पर्स, मोबाइल चोरी झाली असून दिल्ली पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी चोरी करणाऱ्या नोनू आणि बादल अशी या संशयितांची नावे आहेत. संशयितांनी पंतप्रधान मोदींच्या भाचीची पर्स, मोबाइल आणि काही सामान चोरलं होतं. ते सर्व सामान पोलिसांनी संशयितांकडून जप्त केलं आहे. संशियातांना पोलिसांनी सोनीपतच्या बडवानी गावातून अटक केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना संशयितांची माहिती मिळताच त्यांनी त्या ठिकाणावर छापा मारला. पोलिसांना पाहताच संशयित पळून गेले पण त्यांचा पाठलाग करून अटक केलं. पोलिसांच्या माहितीनुसार, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयितांची ओळख पटली. यानंतर पोलिसांनी त्यांच्या ठिकाणांवर छापे मारले. पण त्यांना पोलिसांच्या येण्याची भनक लागली आणि ते तिथून पळून गेले. अखेर पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून पकडले. 



शनिवारी सकाळी दिल्लीच्या वीवीआयपी परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाचीसोबत ही घटना घडली. दोन्ही आरोपी स्कूटीवर बसून आले होते. त्या चोरांनी मोदींच्या भाचीच्याजवळील पर्स, पैसे आणि मोबाइल चोरले. ही घटना शनिवारी सकाळी 7 वाजता झाली. ही घटना घडली तेव्हा दमयंती बेन मोदी ऑटोमध्ये बसल्या होत्या. जशा त्या गुजराती समाज भवनजवळ कुटुंबासोबत उतरली तेव्हा त्यांनी ही चोरी केली. 


दमयंती बेन यांच्या पर्समध्ये जवळपास 56 हजार रुपये होते. तसेच दोन मोबाइल आणि इतर वस्तू. शनिवारी दमयंती बेन या अहमदाबादच्या फ्लाइटने जाणार होत्या. पण या चोरीमुळे ते शक्य झालं नाही. पंतप्रधान मोदींच्या भाचीसोबतच अशी घटना झाल्यामुळे सगळी