5 मिनिटांत एका व्यक्तीला कोरोना लसीचे दोन्ही डोस दिले आणि... पाहा काय झाले
एका व्यक्तीस 5 मिनिटांत कोरोना लसीचे (Corona Vaccine) दोन्ही डोस दिले गेले. त्यानंतर एकच खळबळ उडाली.
मुंबई : उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) ललितपूर जिल्ह्यात (Lalitpur) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेजबाबदारपणाचा कळस दिसून आला. एका व्यक्तीस 5 मिनिटांत कोरोना लसीचे (Corona Vaccine) दोन्ही डोस दिले गेले. ही घटना रावरपुरा परिसरातील लसीकरण केंद्रात घडली. त्यानंतर तेथे एकच खळबळ उडाली.
दोन्ही डोस 5 मिनिटांत दिले गेले
एका वृत्तानुसार, बुधवारी तेथे लस घ्यायला गेलेल्या व्यक्तीने असा आरोप केला आहे की, नर्सिंग कर्मचारी आपापसात इतके व्यस्त होते की त्यांनी पाच मिनिटांतच लसीचा दुसराही डोस दिला. ही व्यक्ती म्हणाली की, लसीचा दुसरा डोस ठराविक मुदतीनंतर घ्यायचा असतो, हे मला माहिती नव्हते. त्याने दावा केला आहे की, कोरोनाची लस घेतल्यानंतर जेव्हा आपण घरी पोहोचलो तेव्हा मी खूप अस्वस्थ झालो. मी याबाबत माझ्या कुटुंबातील सदस्यांना घटनेविषयी सांगितले. त्यानंतर हा सगळा प्रकार पुढे आला. कुटुंबही भयभीत झालेत. त्यांना काय करावे हे सूचत नव्हते. त्यांनी तात्काळ डॉक्टरांशी संपर्क केला.
दुहेरी लसीकरणात कोणतेही नुकसान नाही !
यानंतर त्यांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी (CMO) यांच्याशी संपर्क साधला आणि त्याबद्दल तक्रार केली. त्यानंतर त्याला आपत्कालीन दक्षता विभागात (Emergency Ward) पाठविण्यात आले आणि हे प्रकरण जिल्हा अधिकाऱ्यांनाही कळविण्यात आले. दरम्यान, सीएमओने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले की, दोन्ही डोसच्या लसीकरणानंतर व्यक्तीचे कोणतेही नुकसान होत. ते म्हणाले, लसीच्या दोन डोसमध्ये कमीतकमी 4 आठवड्यांचे अंतर असणे गरजेचे आहे.