नवी दिल्ली : ओएनजीसी ही भारत सरकारची तेल आणि नैसर्गिक वायूचं उत्पादन करणारी महत्वाची कंपनी आहे.


मुंबई हायजवळ मोठा साठा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओएनजीसीला अरबी समुद्रात मुंबई हायच्या पश्चिमेस मोठा साठा सापडला आहे. यासंबंधीची माहिती तेलमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभेत एका प्रश्नावर उत्तर देताना दिली. तेलाचा शोध घेण्यासाठी ९ ठिकाणी चाचपणी केली जात होती. 


अनेक पातळ्यांमध्ये साठा


नवीन साठ्यामध्ये २९.७४ मिलियन टन तेल आणि नैसर्गिक वायूचा साठा आहे. समुद्रात पाण्याखाली अनेक पातळ्यांमध्ये हा साठा दडलेला आहे. मुंबई हायच्या पश्चिमेस हा नवीन साठा आहे. मुंबई हाय हे ओएनजीसीचं सर्वात मोठं तेल उत्खनन क्षेत्र आहे. 


पुढची अनेक वर्षं तेल पुरवठा


या नवीन साठ्यामुळे ओएनजीसीला आपला तेल पुरवठा पुढची अनेक वर्षं करता येणार आहे. ओएनजीसीने मागच्या वर्षी २५.५ मिलियन टन तेलाचं उत्पादन केलं. पुढील वर्षी ते २८-२९ मिलियन टनापर्यत जाईल.