नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाने कोरोना काळात आपल्या गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकांसाठी नवी सुविधा सुरू केली आहे. या सुविधेअंतर्गत आता ग्राहकांना व्याज प्रमाणपत्र मिळणार आहे. आयटीआर भरताना हे प्रमाणपत्र आवश्यक आहे. ज्यामुळे त्यांना आयकरात सूट मिळेल.


प्रमाणपत्र डाऊनलोड कसे करावे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- गृह कर्ज व्याज प्रमाणपत्रासाठी प्रथम आपल्याला आपल्या खात्याचं लॉग इन करावे लागेल.
- लॉगिन नंतर, आपल्याला ''ई सर्विसेज' निवडाव्या लागतील.
- ई-सेवांवर जाऊन, आपल्याला 'माय सर्टिफिकेट' पर्याय निवडावे लागेल.
- येथे आपल्याला आपला गृह कर्ज खाते क्रमांक निवडावा लागेल.
- यानंतर होम लोन इंटरेस्ट प्रमाणपत्र आपोआपच तुमच्या समोर स्क्रीनवर येईल.
- आपण या प्रमाणपत्राची पीडीएफ डाउनलोड करू शकता.


स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या ग्राहकांना डिजिटल सेव्हिंग अकाउंट उघडण्यास परवानगी देते. एसबीआयची अधिकृत वेबसाइट - onlinesbi.com किंवा sbi.co.in वर जाऊन आपण अकाऊंट सुरु करु शकता. तसेच YONO SBI App देखील डाऊनलोड करु शकता.