ऑनलाईन माहिती अधिकारातून माहिती मागविण्यासाठी तुम्हाला आता ५ रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरताना दहा रुपये भरता येत होते. यापुढे ‘पोर्टल फी’चे पाच रुपये असे मिळून एकूण १५ रुपये आकारण्यात येणार आहेत २६ जानेवारी २०१५ रोजी महाराष्ट्राच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने ‘आपले सरकार’ हे नवे वेबपोर्टल महाराष्ट्र सरकारने सुरू केले होते. 


माहितीच्या अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीत सुसुत्रता, गतिमानता आणि सुलभता यावी. यासाठी राज्य सरकारने आपले सरकार हे पोर्टल सुरु केले आहे.  शासकीय कार्यालयातून तुम्ही एखादी माहिती मागवता तेव्हा तुम्हाला अर्जासोबत दहा रुपयांचा कोर्ट फि स्टँम्प लावावा लागतो. पण हिच माहीती जर तुम्ही ऑनलाईन पोर्टलवरून मागवली तर त्यावर पाच रुपयांची जादा रक्कम मोजावी लागत असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय महाऑनलाईन या पोर्टलवर जिएसटी सुध्दा आकारला जात असल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारच्या पोर्टल वरून माहिती मागवल्यास ५ रुपयांचा पोर्टल अधिभार लागत नाही.


माहिती अधिकार फी मध्ये पोर्टल फी म्हणून पाच रूपये वाढविल्याने सरकारी कार्यालयात जावून दहा रूपयांचा कोर्ट फी स्टॅम्प लावणे स्वस्त ठरणार जनतेला स्वस्त ठरणार आहे. त्यामुळे वेब पोर्टलच्या तुलनेत थेट सरकारी कार्यालयातून माहिती मागविण्याचे प्रमाण वाढेल अशी शंकाही व्यक्त करण्यात येत आहे.


पोर्टल अधिभार रद्द करण्याची मागणी


या पोर्टलवरून माहिती मागवण्यासाठी प्रती अर्ज पाच रुपये पोर्टल अधिभार आकारला जात आहे. याशिवाय जीएसटी रकमेपोटी ९० पसे आकारले जात असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे हा पोर्टल अधिभार रद्द करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत यांनी केली आहे.