नवी दिल्ली : तुम्हालाही ऑनलाईन शॉपिंगची आवड आहे? पण ही आवड एका व्यक्तीला चांगलीच महागात पडली आहे. त्याचे झाले असे.


सरप्राईज देण्यासाठी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरूग्राममधील एका व्यक्तीनं आपल्या पत्नीला सरप्राईज देण्यासाठी अॅमेझॉनवरून आयफोन ७ मागवला. यासाठी त्याने ऑनलाईन पैसेही भरले होते. मात्र बॉक्स उघडून बघताच पतीली धक्का बसला. कारण त्यात आयफोन नसून साबणाची वडी होती. त्या व्यक्तीने तातडीने पोलिसात तक्रार केली. त्यानंतर त्याला त्याचे पैसे परत मिळाले. 


फसवणू्क


राजीव जुल्का असं या व्यक्तीचं नाव असून २४ नोव्हेंबरला त्याने अॅमेझॉनवरून ४४,९०० रूपये किंमतीचा आयफोन-७ मागवला होता. परंतु, त्यात आयफोन नसून साबणाची वडी होती. मात्र आयफोनचा चार्जर, हेड फोन्स आणि इतर अॅक्सेसरीज तशाच होत्या.


फसवणू्क झाल्याचे समजताच  राजीव यांनी तातडीनं पोलीसात तक्रार केली. पोलिसांनी मोबाईलची डिलिव्हरी करण्यात आलेल्या डिलिव्हरी बॉयची चौकशी केली आहे. तसेच कंपनीनेही राजीव यांचे सगळे पैसे परत केले आहेत.