कोच्ची : केरळमधील कोच्ची येथे असलेल्या एका लॉजमध्ये सुरु असलेल्या ऑनलाईन देहव्यापाराचे मोठे जाळे उद्ध्वस्त करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी १४ जणांना अटक केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, आम्ही काही वेबसाईट्सवर नजर ठेवली होती आणि त्या वेबसाईट्सच्या माध्यमातून सुरु असलेल्या अवैध हालचालींवर नजर ठेवून ही कारवाई करण्यात आली. 


पोलिसांना मिळालेल्या ठोस माहिती आणि पुराव्यांनंतर एक सापळा रचण्यात आला. शुक्रवारी पोलिसांच्या एका टीमने कोच्चीतील लॉजवर छापा टाकला आणि १४ जणांना अटक केली आहे.


पोलिसांनी सांगितले की, ही टोळी एका महिलेच्या आदेशावर काम करत असे आणि ही महिला दिल्लीची रहिवासी आहे. 


पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये पाच महिला, चार ट्रान्सजेंडर, तीन ग्राहक आणि लॉजचा व्यवस्थापक यांचा समावेश आहे. 


या देहव्यापारात लॉजचा व्यवस्थापक मदत करत होता. त्याच्या मदतीने देहव्यापार चालू होता. अटक करण्यात आलेल्या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.