घरबसल्या ऑनलाईन `असे` कमवा पैसे...
नोकरीच्या शोधात अपयश आल्यास अनेकांना नैराश्य येतं.
नवी दिल्ली : नोकरीच्या शोधात अपयश आल्यास अनेकांना नैराश्य येतं. तर अनेकदा घरबसल्या कंटाळा येतो. मात्र आता तुम्ही घरबसल्या देखील पैसे कमवू शकता. काही अशा वेबसाईट्स आहेत ज्यामुळे तुम्ही घऱबसल्या सामान विकून पैसे कमवू शकता. ब्राऊन मनी असे या वेबसाईट्सचे नाव आहे. यात तुम्ही घरातील वापरात नसलेले सामान विकून पैसे कमवू शकता. रिपोर्टनुसार, भारतात सुमारे ५०,००० कोटींहून अधिक ब्राऊन मनी आहे. सर्व्हतून असे दिसून आले आहे की, काही घरांमध्ये असे सामान आहे त्याचा आपण फार गांर्भीयाने विचार करत नाही. मात्र हेच सामान विकले तर त्याची चांगली किंमत मिळू शकते.
५०,००० कोटींहून अधिक ब्राऊन मनी
घरात वापरून झालेले सामान ऑनलाईन विकण्याची सुविधा देणाऱ्या कंपनीचे म्हणणे आहे की, भारतीयांच्या घरात ५०,००० कोटींहून अधिक वस्तू बेकार धूळ खात पडल्या आहेत. आणि हा आकडा केवळ शहरी भागातील आहे. म्हणून अशाप्रकारच्या सामानाला ब्राऊन मनी म्हटले आहे.
या वेबसाईट्सवर विकू शकता जुनं सामान
घरातील जूने सामान तुम्ही ओएलएक्स आणि क्विकरवर विकू शकता.
ओएलएक्स डॉट इन (olx.in)
क्विकर डॉट कॉम (quikr.com)
कुप्पाथोट्टी डॉट कॉम (kuppathotti.com)
द कबाड़ीवाला डॉट कॉम (TheKabadiwala.com)
रेडीएक्सप्रेस डॉट कॉम (Raddiexpress.com)
अर्थव्यवस्थेला फायदा
अशाप्रकारच्या व्यवहारामुळे जून्या ग्राहकाला पैसे तर मिळतातच. पण त्याचबरोबर त्या वस्तूंचा उपयोग होतो. यामुळे अर्थव्यवस्थेला नक्कीच फायदा होतो.