मुंबई : नुकताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत 5 पैकी 3 राज्यांमध्ये काँग्रेसने सत्ता मिळवली आहे. याआधी भाजपची सत्ता असलेली ही 3 ही मोठी राज्य काँग्रेसने मिळवली आहे. यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा संचार पाहायला मिळतो आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. याआधी राजस्थानमध्ये वसुंधरा राजे मुख्यमंत्री होत्या. देशात फक्त आता एकाच राज्यात एक महिला मुख्यमंत्री आहे. याआधी जम्मू-काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती या मुख्यमंत्री होत्या. पण भाजपने पाठिंबा काढून घेतल्याने त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल आल्यानंतर 29 राज्यांपैकी फक्त एकाच राज्यात आता महिला मुख्यमंत्री राहिल्या आहेत. पश्चिम बंगाल एकमेव असं राज्य आहे जेथे एक महिला मुख्यमंत्री आहे. ममता बॅनर्जी या भाजपच्या कडव्या विरोधी नेत्या आहेत. 2 वर्षापूर्वी भारताच्या चारही बाजुंना माहिली मुख्यमंत्री होत्या. आज हा आकडा चारवरुन एकवर आला आहे. 


साल 2011 आणि 2014 मध्ये चार राज्यांची जबाबदारी महिला मुख्यमंत्र्यांकडे होती. जम्मू-काश्मीरमध्ये महबुबा मुफ़्ती, गुजरातमध्ये आनंदीबेन पटेल, राजस्थानमध्ये वसुंधरा राजे आणि पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी. याआधी तमिळनाडूमध्ये जयललिता य देखील मुख्यमंत्री होत्या. पण त्यांचं निधन झालं. जयललिता यांच्याशिवाय सगळ्याच महिला त्यांच्या राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री होत्या. जयललिता यांच्या आधी जानकी रामचंद्रन हा तमिळनाडूच्या पहिल्या मुख्यमंत्री होत्या.


भारताता आतापर्यंत एकूण 16 महिला मुख्यमंत्री झाल्या आहेत. ज्यामध्ये उमा भारती, राबडी देवी आणि शीला दीक्षित यांची नावं देखील आहे. मायावती आणि जयललिता या सर्वात ताकदवर महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत. ममता बॅनर्जी यांचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून दुसरा कार्यकाळ सुरु आहे. ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत. वसुंधरा राजे सिंधिया या देखील राजस्थानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत. पण यंदा मात्र त्यांना आपली खुर्ची सोडावी लागणार आहे.