नवी दिल्ली :   तुम्ही स्वतःचा व्यवसाय करायच्या विचारात आहात तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. गॅस एजन्सी सुरू करून तुम्ही पैसे कमवू शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गॅस कंपन्या तुम्हांला ही संधी देत आहे. ऑइल कंपन्या आपले वितरण वाढविण्याच्या दृष्टीने नवीन नेटवर्क तयार करीत आहे. २०१९मध्ये नवे ५००० वितरक वाढविण्याचे उद्दिष्ठ कंपन्यांनी ठरवले आहे.  त्यामुळे या माध्यमातून तुम्हांला नियमित उत्पन्न मिळवण्याची संधी उपलब्ध आहे. 


सरकार २००० नवे लायसेन्स  वितरीत केले आहे.  मार्च पर्यंत ३४०० आणखी लायसेन्स वितरीत करणार आहे. नुकतेच एका ड्रॉमध्ये ६०० जणांना निवडण्यात आले आहे. 


महाराष्ट्रातील नागरिकांना संधी 


लायसन्स मिळाल्यावर सुमारे एक वर्षात नवीन गॅस एजन्सी सेट अप करायला लागते.  यात अनेक ठिकाणी मंजुरीची गरज असल्याने इतका कालावधी लागत असतो. यातील जास्त संधी महाराष्ट्र, यूपी, बिहार, बंगाल, उडीशा येथील नागरिकांना आहे. 


अशी मिळणार एजन्सी...


देशातील तीन सरकारी कंपन्या इंडेन, भारत गॅस आणि एचपी डीलर बनविण्यासाठी जाहिरात आणि नोटिफिकेशन जारी केले आहे. २०१९ पर्यंत ५००० वितरकांचे जाळे निर्माण करणार आहे. त्यामुळे या एजन्सी संदर्भात  जाहिरातींवर लक्ष ठेवणे गरजचे आहे. विविध वर्तमानपत्र आणि या तीन कंपन्यांच्या वेबसाईटवर याची जाहिरात झळकणार आहेत. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लॉटरी सिस्टिमने वितरक निवडला जाणार आहे. प्रक्रिया संपूर्ण पारदर्शी असणार आहे.  लॉटरीमध्ये नाव आल्यावर विजेत्याला पुढील प्रक्रियेसाठी बोलविण्यात येणार आहे. 


१० पासलाही मिळणार एलपीजी डिलरशीप 


गॅस एजन्सी उघडण्यासाठी एज्युकेशन क्वॉलीफिकेशन यापूर्वी पदवी असणे गरजेचे होते. पण आता ही आर्हता कमी करत १० पास केली आहे. 


आता ६० वर्षांच्या व्यक्तीलाही संधी 


ऑइल कंपन्यांनी जारी करण्यात आलेल्या गाईडलाइन्सनुसार आता ६० वर्षापर्यंतच्या व्यक्ती अर्ज कर शकणार आहे. यापूर्वी एलपीजी डिस्ट्रीब्यूशन २१ ते ४५ वर्षांची वयोमर्यादा होती. 


फॅमिली यूनिट मध्ये केले बदल.. 


कंपन्यांनी फॅमिली यूनिट च्या व्याख्येत आता विस्तार केला आहे. अर्जशिवाय पती किंवा पत्नी, पालक, भाऊ, बहिणसह सावत्र भाऊ आणि बहिण, मुलांसह दत्तक घेतलेले मुलं,  जावई आणि वहिनी, सासू- सासरे आणि आजोबा आजींना या लिस्टमध्ये सामील करण्यात आले आहे. 


यापूर्वी फॅमिली यूनिटमध्ये  केवळ अर्ज करणारा पती-पत्नी, अविवाहित मुलं येत होते.