नवी दिल्ली : ३० तारखेला GST लागू करण्यासाठी संसदभवनात होणाऱ्या विशेष कार्यक्रमावर काही प्रमुख विरोधी पक्ष बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे. डाव्या पक्षांमधल्या सूत्रांच्या हवाल्यानं पीटीआयनं याबाबतचं वृत्त दिलंय. सरकारची यंत्रणा GSTसाठी तयार नसताना नवी कररचना लागू करण्याची सरकार घाई करत असल्याचं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे. त्यामुळेच या कार्यक्रमात सहभागी व्हायचं नाही, अशा निर्णयाप्रत काही पक्ष आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

GSTसंदर्भात अनेक गट नाराज असून लोकांना त्रास होणार असेल, तर त्याचा सोहळा होऊ शकत नाही असं एका डाव्या नेत्यानं म्हटलंय. या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला नसला, तरी आपल्या पक्षाच्या खासदारांना तिथं हजर राहण्यासाठी पक्षादेशही काढलेला नाही असं सूचक विधान माकपा नेते सीताराम येच्युरी यांनी नुकतंच केलं होतं. असं असलं तरी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी मात्र GSTबाबत पुन्हा एकदा देशाला आश्वस्त केलंय.