नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक सुरु आहे.मोदी सरकारच्या धोरणांच्या विरोधात राष्ट्रमंचच्या बॅनरखाली ही बैठक सुरु असून या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बैठकीला कोण उपस्थित
राजकारण्यांसह विविध क्षेत्रातील नामवंतांना या बैठकीत पाचारण करण्यात आलं आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे माजिद मेमन, वंदना चव्हाण, सीपीआयचे विनय विश्वम, आम आदमी पार्टीचे शुशील गुप्ता, सपाचे घनश्याम तिवारी, ज्येष्ठ वकिल के टी एस तुलसी, पत्रकार करण थापर, आशुतोष, आरएलडीचे जयंत चौधरी, माजी खासदार शाहीद सिद्दीकी, ओमर अब्दुल्ला, गीतकार जावेद अख्तर हे उपस्थित आहेत.



ममता बॅनर्जी, काँग्रेस पवारांवर नाराज
दरम्यान, ममता बॅनर्जी आणि काँग्रेस पक्ष शरद पवारांवर नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. काँग्रेसला वगळून तिसरी आघाडीसाठी पवार प्रयत्न करत असल्याने काँग्रेस नाराज असल्याची चर्चा आहे.


भाजपने म्हटलं 'ठगबंधन'
राष्ट्रमंचच्या बैठकीवर भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी टीका करतात ही 'ठगबंधन' बैठक असल्याचं म्हटलं आहे. बैठकीनंतर सर्व हातात हात घालून उभे राहतात, पण निवडणुका मात्र वेगळ्या लढवतात, असं संबित पात्रा यांनी म्हटलंय.