Optical Illusion: कमळांमध्ये लपलाय बेडूक, फक्त बुद्धिमान व्यक्ती 36 सेकंदात शोधू शकतात
फोटोमध्ये लपलेला बेडून नक्की आहे तरी कुठे, तुम्हाला दिसला का?
मुंबई : सध्या पावसाळा सुरू आहे, त्यामुळे अनेक बेडूक, गांडूळ दिसतात. शिवाय असे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. आता देखील एक फोटो व्हायरल होत आहे. फोटोमध्ये अनेक कमळांमध्ये एक बेडून लपून बसला आहे. अशा फोटोंना Optical Illusion पिक्चर्स म्हणतात. हे असे फोटोज आहेत, जे पाहून तुमचे डोळे सहज फसू शकतात.
महत्त्वाचं म्हणजे कमळांमध्ये लपलेल्या बेडकाला तुम्ही 36 सेकंदात शोधू शकलात, तर तुम्ही बुद्धिमान आहात. कारण फोटोमध्ये सर्वत्र हिरवळ आहे आणि त्यामध्ये कमळाची फुले. हा फोटो पाहूनच फार प्रसन्न वाटेल. त्यामुळे बेडूक नक्की कुढे बसला आहे, हे कळणारचं नाही.
पण जर का तुम्ही फोटोचं निट निरीक्षण केलं, तर तुम्हाला कळेल की त्यामध्ये एक बेडूक लपून बसलेला आहे. तुम्ही फोटोत लपलेल्या बेडकाला 36 सेकंदात शोधलं असेल, तर तुम्हाला ही कळेल हिरव्या पानावर कसा बेडूक बसला आहे.
या फोटोमध्ये तुम्ही काळजीपूर्वक पाहिलं तर लपलेला बेडूक दिसून येईल. फोटोच्या मध्यभागी एका पानावर बेडूक लपला आहे. पाहा फोटो...