मुंबई : Optical Illusion Viral Photo: ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) ट्रेंड संपला आहे, तेव्हा एक नवीन चित्र व्हायरल होते. गेल्या काही आठवड्यांमध्‍ये, अनेक ऑप्टिकल इल्युजन फोटोमुळे  (Optical Illusion Image)लोकांना डोके खाजवावे लागत आहे. आता एका झोपडीसह जंगलाचे सुंदर चित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, या चित्रात अस्वल कुठे दिसतंय हे शोधून काढावं लागेल. तासनतास चित्राकडे टक लावून पाहिल्यानंतरही कुशाग्र बुद्धीच्या लोकांना ते कळू शकले नाही. मात्र, ज्यांना दिसणार नाही, त्यांना आम्ही मदत करणार आहोत.


तुम्हाला या चित्रात अस्वल शोधावे लागेल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो बघा. चित्रात लपलेले अस्वल तुम्हाला सापडते का ते पाहा ? कदाचित तो जमिनीवर बसला असेल किंवा विश्रांतीसाठी झाडाच्या फांदीवर चढला असेल. उत्तर शोधण्यासाठी आजूबाजूला चित्र पाहावे लागेल. ज्यांनी अद्याप अस्वल पाहिलेले नाही, तर मग आम्ही तुम्हाला मदत करु आणि चित्रात अस्वल कुठे आहे ते सांगू. जेव्हा चित्र पहिले जाते तेव्हा लोक मध्यभागी आणि नंतर चार कोपऱ्याकडे पाहतात, परंतु आपल्याला त्यापलीकडे पाहावे लागेल.


हुशार लोकलही झालेत फेल


आता तुम्ही केवळ झाडाच्या फांद्या पाहा. तुम्ही अजून पाहिलं नाही का? आम्ही समजू शकतो, कारण हा ऑप्टिकल भ्रम (Optical Illusion) थोडा गोंधळात टाकणारा आहे. अस्वल शोधू शकलेले तुम्ही एकमेव नाही, तर असे शेकडो लोक आहेत जे लपलेले प्राणी शोधण्यात अयशस्वी किंवा फेल झालेले आहेत. उत्तर जाणून घेण्यासाठी खालील चित्र पाहा.



तरीही तुम्हाला ते सापडत नसेल तर इथे उत्तर 


तुम्हाला झाडातील अस्वलाची रुपरेषा दिसेल. चित्रात अस्वल सापडल्यानंतर एका वापरकर्त्याने 'मी खऱ्या अस्वलाला शोधत होतो,' अशी टिप्पणी केली. दुसर्‍या यूजरने लिहिले की, 'बर्‍याच वेळा पाहिल्यानंतर मला फांद्यांमधील प्राण्याची रुपरेषा दिसली.' तिसरा यूजर गमतीने म्हणाला, 'हे खूप अवघड आहे. माझे वडील किराणा दुकानात जे शोधतात त्याच प्रकारे जवळजवळ आहे. यापूर्वी लाकडाच्या ढिगाऱ्यावर बसलेल्या मांजरीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मांजर अशा ठिकाणी पडली होती की वापरकर्त्यांना डोके खाजवायला भाग पाडले.